
Asia Cup, India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबर रोजी होणारा आशिया कप क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हा सामना आयोजित करणे राष्ट्रीय हिताच्या विरोधात आहे आणि हल्ल्यात प्राण गमावलेल्या सशस्त्र दलांच्या आणि नागरिकांच्या बलिदानाचा अपमान करणारा आहे.
उर्वशी जैन यांच्यासह कायद्याच्ं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी संविधानाच्या अनुच्छेद 32 अंतर्गत ही जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांनी भारत सरकारला या संदर्भात योग्य निर्देश देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. वकील स्नेहा राणी आणि अभिषेक वर्मा यांनी सांगितले की, आशिया कप टी-20 लीगचा भाग म्हणून दुबईमध्ये होणारा हा सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- IND vs UAE: सूर्यकुमार यादवची 'खिलाडूवृत्ती', टॉवेलमुळे आऊट झालेल्या खेळाडूला पुन्हा बोलावले, नेमकं काय घडलं?)
याचिकेतील मुख्य मुद्दे
याचिकेत असे म्हटले आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना आयोजित करणे राष्ट्रीय सन्मान आणि जनभावनांच्या विरोधात आहे.
पाकिस्तानसारख्या दहशतवादाला आश्रय देणाऱ्या राष्ट्रासोबत खेळात सहभागी होणे हे सशस्त्र दलांचे मनोधैर्य कमी करते आणि शहीद आणि दहशतवादाच्या पंडित कुटुंबांना त्रास देणारे आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे.
(नक्की वाचा : Rinku Singh: ‘वो रोने लगी...' 5 सिक्सने कशी सेट केली प्रिया सरोजसोबतची लव्ह स्टोरी? रिंकूने सांगितली गोष्ट )
याचिकाकर्त्यांनी असाही तर्क दिला आहे की, क्रिकेटला राष्ट्रीय हित आणि देशातील जनतेच्या तसेच लष्कराच्या निष्ठेपेक्षा आणि बलिदानापेक्षा मोठे मानले जाऊ शकत नाही. या याचिकेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, 2025 लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world