बाबर आझम हा पाकिस्तानचा मुख्य खेळाडू समजला जातो. मात्र मागिल काही काळापासून तो आपल्या फॉर्ममध्ये दिसत नाही. त्याला साजेसा असा खेळ करता आलेला नाही. त्यात आता दक्षिण अफ्रिके विरुद्ध कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात बाबर आझमला केवळ चार धावाच करता आल्या. चार धावा काढून तो बाद झाला. मात्र त्या आधी त्याने क्रिकेटमध्ये एक रेकॉर्डला गवसणी घातली. त्याने रोहित शर्मा, विराट कोहलीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा ओलांडणारा जगातला तिसरा खेळाडू ठरला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्या सेंचुयरियनमध्ये पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत दक्षिण अफ्रिकेने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय किती योग्य होता हे पहिल्या तासातच समजले. पाकिस्तानचे आघाडीचे चार फलंदाज केवळ 56 धावांमध्येच तंबूत परतले. त्यान शान मसूद, सैम अयूब, बाबर आजम आणि कामरान गुलाम यांचा समावेश होता.
या सामन्यात बाबर आजम (Babar Azam Record) याने मोठी खेळी केली नाही. त्याने फक्त चार धावाच केल्या. मात्र या चार धावाही त्याच्यासाठी मौल्यवान ठरल्या. त्याने या चार धावांसह एक रेकॉर्डला गवसणी घातली. या चार धावा काढल्यानंतर बाबर आझम क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चार हजार धावा करणारा जगातला तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विरोट कोहली, रोहित शर्मा यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये चार हजार धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेट, एक दिवसीय क्रिकेट आणि ट्वेंटी ट्वेंटी या तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतीय फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा यांचा दबदबा राहिलेला आहे. या दोघांनी या सर्व फॉर्मेटमध्ये चार हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यांच्या पंगतीत आता पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम जावून बसला आहे. सध्या जरी बाबर आझमचा फॉर्म चांगला नसला तरी त्याला दिलासा देणारी घटना या निमित्ताने घडली आहे.