टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड सध्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. लंडनमधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. माजी कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयला अंशुमन यांना मदत करण्याचं आवाहन केलं होते. त्यानुसार बीसीसीआयने अंशुमन यांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
BCCI सचिव जय शाह यांना गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अंशुमन गायकवाड यांना 1 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
( नक्की वाचा : 6,6,4,6 युवराज सिंहचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध रौद्र रुप, जुन्या आठवणी झाल्या ताज्या, Video )
बीसीसीआय संकटाच्या या काळात गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभी आहे. गायकवाड यांना बरे होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते करेल. बीसीसीआय गायकवाड यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांवर लक्ष ठेवत राहील. यातून ते बाहेर येतील असा विश्वास आहे, बीसीसीआयने व्यक्त केला.
अंशुमन गायकवाड यांची कारकीर्द
अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात 40 टेस्ट आणि 15 वन-डेमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर ते दोन वेगवेगळ्या कालखंडात टीम इंडियाचे हेड कोच होते.