Cricket News: विराट-रोहितला मोठा धक्का बसण्याची शक्यता; काय आहे BCCI चा प्लॅन?

Cricket News: A+ श्रेणी जी 7 कोटी रुपयांची आहे ती बंद होऊ शकते. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या केवळ एकच फॉरमॅट (वनडे) खेळत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक केंद्रीय करारांमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावित बदलांचा सर्वाधिक फटका दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना बसू शकतो. कारण बीसीसीआय 'ए+' ही सर्वोच्च श्रेणीच रद्द करण्याच्या विचारात आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीने केंद्रीय करारातील 'ए+' श्रेणी रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या केवळ वनडे फॉरमॅट खेळत असल्याने, त्यांना श्रेणी 'बी' मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या वार्षिक मानधनात 4 कोटींची कपात होऊ शकते.  न्यूज एजन्सी 'एएनआय' (ANI) ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केंद्रीय कराराच्या रचनेत आमूलाग्र बदल सुचवले आहेत.

(नक्की वाचा- Ind vs Nz, 3rd ODI : भारताने मालिका गमावली, पण कोहलीची जगभरात चर्चा..सेहवाग अन् पॉन्टिंगचा मोठा रेकॉर्ड मोडला)

काय आहे नवीन प्रस्ताव?

सध्या बीसीसीआयचे करार A+, A, B, आणि C अशा चार श्रेणींमध्ये विभागलेले आहेत. निवड समितीने ही रचना बदलून केवळ A, B आणि C अशा तीनच श्रेणी ठेवण्याची शिफारस केली आहे.

Advertisement

A+ श्रेणी जी 7 कोटी रुपयांची आहे ती बंद होऊ शकते. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या केवळ एकच फॉरमॅट (वनडे) खेळत आहेत. बीसीसीआयच्या नियमांनुसार, जे खेळाडू तिन्ही फॉरमॅट खेळतात त्यांना सर्वोच्च प्राधान्य मिळते. त्यामुळे या दोन्ही दिग्गजांना थेट ग्रेड 'बी' (3 कोटी) मध्ये टाकले जाऊ शकते. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर विराट आणि रोहित यांच्या उत्पन्नात 4 कोटी रुपयांची घट होईल.

(नक्की वाचा-Video : शांतपणे मटार सोलणाऱ्या गर्लफ्रेंडवर शिखर धवन संतापला, ओरडत ओरडत म्हणाला, "माझं आयुष्य बरबाद..")

सध्याच्या श्रेणी आणि खेळाडू

  • ग्रेड A+ (7 कोटी): रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा.
  • ग्रेड A (5 कोटी): शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, केएल राहुल.
  • ग्रेड B (3 कोटी): सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर.
  • ग्रेड C (1 कोटी): रिंकू सिंह, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, इशान किशन आणि इतर 18 खेळाडू.

अंतिम निर्णय कधी?

बीसीसीआयच्या आगामी अ‍ॅपेक्स कौन्सिल (Apex Council) च्या बैठकीत या नवीन मॉडेलवर चर्चा होऊन त्याला अंतिम मंजुरी दिली जाईल.
 

Topics mentioned in this article