जाहिरात

काय आहे Boxing Day Test? ती दरवर्षी 26 डिसेंबरलाच का सुरु होते? वाचा सर्व माहिती

Boxing Day Test : 26 डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या टेस्ट मॅचला बॉक्सिंग-डे टेस्ट असं म्हंटलं जातं.

काय आहे Boxing Day Test? ती दरवर्षी 26 डिसेंबरलाच का सुरु होते? वाचा सर्व माहिती
File photo of Pat Cummins and Rohit Sharma
मुंबई:

Boxing Day Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बहुप्रतीक्षीत बॉक्सिंग डे टेस्ट गुरुवारपासून (26 डिसेंबर) मेलबर्नमध्ये सुरु होत आहे. पाच टेस्टच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy 2024-25) आत्तापर्यंत तीन टेस्ट झाल्या आहेत. तीन टेस्टनंतर दोन्ही टीम 1-1 नं बरोबरीत आहेत. त्यामुळे मेलबर्नमध्ये गुरुवारी सुरु होणारी बॉक्सिंग डे टेस्ट दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.

26 डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या टेस्ट मॅचला बॉक्सिंग-डे टेस्ट असं म्हंटलं जातं. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत ही टेस्ट खेळली जाते. ऑस्ट्रेलियामध्ये  बॉक्सिंग डे टेस्ट मॅचला सुरुवात झाली. त्यानंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतही ही परंपरा सुरु झाली. ऑस्ट्रेलियन टीम दरवर्षी बॉक्सिंग डे टेस्ट खेळते. अन्य टीम दरवर्षी ही टेस्ट खेळतेच असं नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या टेस्टच्या नावावरुन ही बॉक्सिंगशी संबंधित असल्याचा तुमचा समज होईल पण, याचा बॉक्सिंगशी काहीही संबंध नाही.  ही परंपरा कधी सुरु झाली, तसंच याला बॉक्सिंग डे हे नाव का पडलं याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

काय आहे बॉक्सिंग डे?

बॉक्सिंग डे बाबत अनेत समजुती आहेत. त्यामधील एका प्रमुख समजुतीनुसार ख्रिसमसच्या दिवशी काम करणाऱ्या लोकांना त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबर रोजी सुट्टी दिली जाते. त्यांना त्या दिवशी एका बॉक्समध्ये भेटवस्तू दिल्या जातात. त्यामुळे त्याला बॉक्सिंग डे असं म्हंटलं जातं. 

Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष?

( नक्की वाचा : Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष? )

आणखी एका समजुतीनुसार ख्रिसमसच्या रात्री गरीब नागरिकांसाठी काही गिफ्ट बॉक्स चर्चच्या बाहेर ठेवले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गरजू व्यक्ती चर्चमध्ये येऊन बॉक्स घेऊन जातात. त्यामुळे देखील त्याला बॉक्सिंग डे असं म्हंटलं जातं. या दोन्ही प्रमुख समजुतीनुसार बॉक्सिंग डे चा संबंध बॉक्सिंग या खेळाशी नसून गिफ्ट बॉक्सशी असल्याचं स्पष्ट होतं. या दिवशी अनेक देशांध्ये सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या या सुट्टीच्या दिवशी अनेक जणं जोरदार शॉपिंग करतात आणि त्यांच्या मित्रांना तसंच कुटुंबीयांना भेटवस्तू देतात.

कधी सुरु झाली बॉक्सिंग डे टेस्ट?

ऑस्ट्रेलियात बॉक्सिंग डे टेस्ट मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानातच खेळली जाते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 1950 साली झालेल्या सामन्यानं याची सुरुवात झाली. ती टेस्ट मॅच 22 डिसेंबर रोजी सुरु झाली होती. त्या टेस्टचा पाचवा दिवस 26 डिसेंबर रोजी होता. तेव्हापासून ऑस्ट्रेलियात ही परंपरा सुरु झाली. 

Champions Trophy 2025 : भारत - पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत 'या' तारखेला भिडणार, वाचा संपूर्ण वेळापत्रक

( नक्की वाचा :  Champions Trophy 2025 : भारत - पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत 'या' तारखेला भिडणार, वाचा संपूर्ण वेळापत्रक )

सुरुवातीला मेलबर्नमध्ये होणाऱ्या टेस्टमधील एक दिवस हा 26 डिसेंबर असे. 1974-75 मधील अ‍ॅशेस सीरिजमधील मेलबर्नला झालेल्या टेस्टचा पहिला दिवस 26 डिसेंबर होता. तेव्हापासून बॉक्सिंग डे टेस्टची सुरुवात 26 डिसेंबरपासून होत आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com