टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. फायनल 15 खेळाडूंमध्ये कुणाला संधी द्यायची यावरुन सिलेक्शन कमिटीपुढे पेच निर्माण झाला आहे. रिपोर्टनुसार, कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड, चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्यात रविवारी झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर येत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वर्ल्ड कपसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याचा निर्णय आता पूर्णपणे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असणार आहे. दोन जागांमुळे निर्णय अडला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासोबत आता बीसीसीआय अधिकाऱ्यांनी अहमदाबाद येथे बैठक होणार आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा 1 मे रोजी बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा- कष्टाला मिळणार फळ! ऋषभ पंतवर वर्ल्ड कपमध्ये मोठी जबाबदारी?
कोणत्या खेळाडूंबाबत पेच?
अनेक खेळाडूंबाबत विचार केल्यानंतर दोन जागांसाठी बीसीसीआयचे टीम सिलेक्शन अडलं आहे. यामध्ये हार्दिक पांड्याच्या प्रदर्शनामुळे सिलेक्टर्ससमोरील आव्हान वाढलं आहे. दुसरा प्रश्न म्हणजे विकेटकीपर कोण असेल. यामध्ये केएल राहुल, संजू सॅमसन की ऋषभ पंत कुणाला संधी द्यायची, या संभ्रमात सिलेक्टर्स आहेत. तसेच दुसरा विकेटकीपर कोण असेल, हा देखील प्रश्न आहे.
(नक्की वाचा : विराट, रोहित नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू असेल X फॅक्टर, युवराजची भविष्यवाणी )
रिपोर्ट्सनुसार केएल राहुल आणि संजू सॅमसन यांचा या जागेसाठी संघर्ष सुरु आहे. संजू सॅमसनचा सध्याचा आयपीएलमधील फॉर्म कमाल आहे. सातत्याने त्याने राजस्थानसाठी चांगलं प्रदर्शन केलं आहे. मात्र तिसऱ्या नंबरवर खेळण्यासाठी त्याला टीम इंडियात जागा नाहीये. तसेच संजूचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील आकडे काही खास नाहीत. त्यामुळे फक्त आयपीएलच्या आधारावर त्याला संघात स्थान मिळणे कठीण आहे.
केएल राहुल एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याचं पारडं जड आहे. त्यामुळे सिलेक्शन कमिटीदेखील त्याच्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकते. वेस्ट इंडीजसारख्या धीम्या पीचवर पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर तो चांगला खेळाडू मानला जातोय.