जाहिरात
Story ProgressBack

कष्टाला मिळणार फळ! ऋषभ पंतवर वर्ल्ड कपमध्ये मोठी जबाबदारी?

T20 World Cup 2024:  ऋषभ पंत (Rishabh Pant) टी 20 वर्ल्ड कप खेळणार की नाही? याबाबत गेल्या महिनाभरापासून जोरदार चर्चा होती.

Read Time: 2 min
कष्टाला मिळणार फळ! ऋषभ पंतवर वर्ल्ड कपमध्ये मोठी जबाबदारी?
Rishabh Pant : मोठ्या अपघातानंतर पंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. (फोटो - AFP)
मुंबई:

T20 World Cup 2024:  ऋषभ पंत (Rishabh Pant) टी 20 वर्ल्ड कप खेळणार की नाही? याबाबत गेल्या महिनाभरापासून जोरदार चर्चा होती. मोठ्या अपघातानंतर पंत या आयपीएलमध्ये मैदानात परतलाय. त्याचा फॉर्म आणि फिटनेसवर काही जणांकडून सातत्यानं शंका व्यक्त करण्यात येत होती. पण, गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्लीत झालेल्या सामन्यात पंतनं नाबाद 88 रनची दमदार खेळी केली. या खेळीनंतर त्यानं सर्व टीकाकारांना गप्प केलं आहे. ऋषभ पंतनं गेल्या काही महिन्यात त्याच्या फिटनेसवर जोरदार मेहनत घेतलीय. त्याचबरोबर त्याचा जुना टच देखील आता परतलाय. या कष्टाचं फळ पंतला मिळण्याची शक्यता आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी ऋषभ पंत व्हाईस कॅप्टन पदासाठी प्रबळ दावेदार आहे. निवड समितीच्या आगामी बैठकीत त्यावर गांभीर्यानं विचार होऊ शकतो. 2022 च्या शेवटी अपघातामध्ये गंभीर जखमी होण्यापूर्वी पंत टीमचा व्हाईस कॅप्टन होता.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ऋषभनं 2022 जूनमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय टीमचं नेतृत्त्व केलंय. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टी20 वर्ल्ड कपमध्ये पंत पहिल्या पसंतीचा विकेटकिपर असेल. व्हाईस कॅप्टन होण्यासाठी टीममध्ये मोठी स्पर्धा आहे. या पदासाठी हार्दिक पांड्या देखील दावेदार आहे. पण, सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिकला कोणताही प्रभाव टाकता आलेला नाही. त्याचबरोबर मैदानात आणि मैदानाबाहेरही तो वादात सापडलाय. ही गोष्ट पंतच्या पथ्यावर पडू शकते.

या सर्व कारणांनंतरही हार्दिक पांड्याची दावेदारी सहज संपत नाही. तो मागील टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन होता. गोलंदाजीची क्षमता ही त्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे पांड्या आणि पंतमध्ये व्हाईस कॅप्टनसाठी चुरस असेल. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची टॉप ऑर्डरमधील जागा नक्की आहे.

( नक्की वाचा : विराट, रोहित नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू असेल X फॅक्टर, युवराजची भविष्यवाणी )
 

मिडल ऑर्डरमध्ये ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा असतील. शिवम दुबे आणि रिंकू शर्मा यापैकी एकाची निवड होऊ शकते. त्याचबरोबर संजू सॅमसन आणि केएल राहुल यापैकी एकालाच वर्ल्ड कपमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. 

स्पिनर्समध्ये कुलदीप यादवची निवड निश्चित आहे. दुसऱ्या स्पिनरसाठी अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांच्यात स्पर्धा आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या युझवेंद्र चहलला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. फास्ट बॉलर्समध्ये बुमराह आणि अर्शदीप यांची जागा नक्की आहे. सिराज आणि संदीप शर्माच्याबाबत मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. टीममध्ये चौथा फास्ट बॉलर घ्यायाचा की अतिरिक्त फलंदाज? या प्रश्नावर रोहित शर्माचं मत निर्णायक ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination