
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलदेव, महेंद्रसिंह धोनी, मिताली राज यांच्यासह आणखी एका खेळाडूचा जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान खेळाडू सौरव गांगुलीवर बायोपिक येणार आहे. स्वत: सौरभ गांगुलीने याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बायोपिक येणार असल्याचे अखेर निश्चित झाले आहे. स्वतः सौरव गांगुलीने एका मुलाखतीत बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. सौरव गांगुलीने खुलासा केला की बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावला त्याची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आले आहे. माझ्या माहितीनुसार, राजकुमार राव ही भूमिका साकारणार आहे, परंतु चित्रीकरण वेळापत्रक आणि तारखांबाबत काही आव्हाने आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यास एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो, असेही त्याने सांगितले.
या बायोपिकची घोषणा 2021 मध्ये करण्यात आली होती आणि त्याचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने यांच्याकडे सोपवण्यात आले आहे, मोटवानी यांनी 'उडान' आणि 'लुटेरा' सारखे गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मात्र सौरव गांगुलीच्या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झाले नसून तारखांबाबत काही अडचणी असल्याचे समोर आले आहे.
(नक्की वाचा- आमदार निवासातील घरांवरुन आमदारांमध्ये जुंपली; अनेक मंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर)
दरम्यान, सौरव गांगुलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण 18,575 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्यांनी भारतीय संघाला 21 कसोटी विजय आणि 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, सौरव गांगुलीने बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे अध्यक्ष आणि नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. आता सौरव गांगुलीच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू मोठ्या पडद्यावर आणणाऱ्या या बायोपिकची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, राजकुमार रावला लवकरच दादाच्या भूमिकेत पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world