Cricket News: पंजाब क्रिकेटला मोठा धक्का! विराट कोहलीचा माजी सहकाऱ्याचे 36 व्या वर्षी निधन

पंजाबचा माजी क्रिकेटपटू आणि वरिष्ठ निवड समितीचा सदस्य अमनप्रीत सिंग गिल याचे अकाली निधन झाले आहे. तो विराट कोहलीच्या पिढीतील खेळाडू होता आणि त्याने अंडर 19 भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

पंजाब क्रिकेट विश्वासाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. पंजाबचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या वरिष्ठ निवड समितीचा सदस्य अमनप्रीत सिंग गिल याचे 36 व्या अकाली निधन झाले आहे. अमनप्रीतच्या निधनामुळे क्रीडा प्रेमींमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विराट कोहलीचा होता सहकारी

अमनप्रीत सिंग गिल हा विराट कोहली, सौरभ तिवारी आणि मनीष पांडे यांच्या पिढीतील एक गुणवान खेळाडू होता. 2007 मध्ये त्याने भारताच्या अंडर 19  संघाचे प्रतिनिधित्व केले होते. श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेत तो विराट कोहलीसोबत खेळला होता. या मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने 19 धावांत 3 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यानंतर मलेशियात झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी त्याची निवड होऊ शकली नव्हती.

Advertisement

(नक्की वाचा-  Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट)

पंजाब क्रिकेटमधील योगदान

अमनप्रीत आयपीएलच्या पहिल्या हंगामात 'किंग्स इलेव्हन पंजाब' (आताचा पंजाब किंग्स) संघाचा भाग होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो पंजाबच्या वरिष्ठ निवड समितीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याने भारतासाठी पाच 'युथ वनडे' आणि एक 'युथ टेस्ट' खेळली होती. त्याने श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराची विकेट घेण्याची कामगिरीही केली होती.

(नक्की वाचा-  Nagraj Manjule: नागराज मंजुळेसह जिओ सिनेमाला पुणे न्यायालयाचा दणका! 'खाशाबा'चा वाद थेट कोर्टात

युवराज सिंगने वाहिली श्रद्धांजली

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने अमनप्रीतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याने 'X' वर लिहिले की, "अमनप्रीत सिंग गिलच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले. आम्ही सुरुवातीच्या दिवसात एकत्र ड्रेसिंग रूम शेअर केली होती. तो एक शांत, कष्टाळू आणि क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा खेळाडू होता. त्याच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती."

"पंजाब क्रिकेट असोसिएशन अमनप्रीत सिंग गिलच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत आहे. आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्याच्या आत्म्यास शांती मिळो", असे पीसीएने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
 

Topics mentioned in this article