जाहिरात

अनन्या नाही तर 'या' गायिकेसोबत डेट करतोय हार्दिक पांड्या! 'त्या' फोटोनं चर्चेला उधाण

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) एका गायिकेला डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अनन्या नाही तर 'या' गायिकेसोबत डेट करतोय हार्दिक पांड्या! 'त्या' फोटोनं चर्चेला उधाण
Hardik Pandya and Jasmin Walia (courtesy: hardikpandya, jasminwalia)
मुंबई:

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल अभिनेत्री नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) यांनी चार वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. या दोघांनी जुलै महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहून ही घोषणा केली. या दोघांना अगस्त्य हा एक मुलगा आहे. हार्दिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर नताशा सर्बियामध्ये निघून गेली. नताशा आणि अगस्त्यचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुसरिकडं हार्दिकचं नाव अभिनेत्री अनन्या पांड्यासोबत काही जणांनी जोडलं होतं. अनंत अंबानीच्या लग्नात दोघं एकत्र दिसल्याची चर्चाही होत होती. या विषयावर दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. श्रीलंका विरुद्धची सीरिज आटोपल्यानंतर हार्दिक पांड्या सध्या ग्रीसमध्ये सुट्टीचा आनंद घेतोय. त्याच्या ग्रीसमधील एका फोटोनं तो अनन्या पांडे नाही तर जॅस्मिन वालिया (Jasmin Walia)  या ब्रिटीश गायिकेसोबत डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

हार्दिक आणि जॅस्मिन यांनी ग्रीसमधील एकाच लोकेशनवरुन फोटो शेअर केला आहे. ग्रीसमधील  एका सुंदर स्विमिंग पूलच्या जवळचा हा फोटो आहे. या दोघांच्याही फोटोचं बॅकग्राऊंड सारखं असल्यानं ते एकाच ठिकाणी असून परस्परांना डेट करत आहेत असा अंदाज फॅन्स व्यक्त करत आहेत. 

( नक्की वाचा - घटस्फोटानंतरही प्रेम कायम! नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रिया Viral )

विशेष म्हणजे जस्मिननं हार्दिकची ही पोस्ट लाईक केली आहे. हार्दिकनं जॅस्मिनचा बिकनीवाल्या फोटोवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, त्यापूर्वी त्यानं जॅस्मिनचे अनेक फोटो लाईक केले आहेत. दोघांनी परस्परांचे फोटो लाईक केल्यानं फॅन्सचं त्याच्याकडं लक्ष वेधलं आहे. आता त्यांच्या रिलेशनशिपमधील चर्चेत किती सत्य आहे हे येत्या काही दिवसांमध्ये समजेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
अर्शद नदीमनं चोळलं भारताच्या जखमेवर मीठ, लष्करच्या दहशतवाद्यासोबत दिसला पाकिस्तानचा चॅम्पियन, Video
अनन्या नाही तर 'या' गायिकेसोबत डेट करतोय हार्दिक पांड्या! 'त्या' फोटोनं चर्चेला उधाण
morne-morkel-appointed-as-team-india-mens-bowling-coach
Next Article
गौतम गंभीरची मागणी पूर्ण, 'हा' दिग्गज झाला टीम इंडियाचा बॉलिंग कोच