जाहिरात

Hardik Pandya New Look: हार्दिक ओळखू येईना! आशिया कपआधी पांड्यांच्या नवा लूक

आशिया कप 2025 मध्ये हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी 'एक्स फॅक्टर' ठरू शकतो. तो संघातील एक अनुभवी खेळाडू आहे आणि तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये कमाल करू शकतो.

Hardik Pandya New Look: हार्दिक ओळखू येईना! आशिया कपआधी पांड्यांच्या नवा लूक

आशिया स्पर्धेपूर्वी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या नव्या 'लूक' मध्ये दिसला आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेआधी हार्दिकने आपले केस कापले आहेत आणि कलरही केला आहे. हा नवा लूक त्याच्यावर खूपच चांगला दिसत आहे आणि त्याने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.

हार्दिक पंड्यासोबतच भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव देखील दुबईसाठी रवाना होताना दिसला. भारतीय संघ 5 सप्टेंबर रोजी आयसीसी अकादमीमध्ये पहिल्या सराव सत्रात भाग घेणार असल्याची माहिती आहे.

(नक्की वाचा : Amit Mishra: 25 वर्षांच्या प्रवासानंतर अमित मिश्राचा निवृत्तीचा निर्णय; नावावर आहे भयंकर दुर्मीळ रेकॉर्ड )

आशिया कप 2025 मध्ये हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी 'एक्स फॅक्टर' ठरू शकतो. तो संघातील एक अनुभवी खेळाडू आहे आणि तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये कमाल करू शकतो. भारतीय संघाला हार्दिककडून खूप अपेक्षा आहेत, कारण त्याचा फॉर्म संघाच्या यशासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

(नक्की वाचा- Ruturaj Gaikwad : आशिया कपमध्ये संधी नाही, ऋतुराजनं दमदार सेंच्युरी झळकावत निवड समितीला उत्तर)

भारताचे वेळापत्रक

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध (UAE) खेळणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे, ज्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, 18 सप्टेंबर रोजी भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील आपला शेवटचा सामना ओमानविरुद्ध (खेळणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com