जाहिरात

Virat Kohli: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवा ट्विस्ट! अकायच्या PTM साठी विराटनं दौरा सोडला? व्हायरल दाव्याचं सत्य काय?

Virat Kohli: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवा ट्विस्ट! अकायच्या PTM साठी विराटनं दौरा सोडला? व्हायरल दाव्याचं सत्य काय?
Virat Kohli : विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आत्तापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे.
मुंबई:

Virat Kohli, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) बद्दल सोशल मीडियावर खळबळ माजवणारा एक दावा व्हायरल झाला होता. पहिल्या दोन वन-डे सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाल्यानंतर, तो आपला मुलगा अकायच्या शाळेतील पालक-शिक्षक भेटीसाठी (Parent-Teacher Meeting) लंडनला परतत असल्याचा हा दावा होता. मात्र, या व्हायरल व्हिडिओमधील माहिती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे, याचे 'फॅक्ट चेक'मध्ये (Fact Check) सत्य उघड झाले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराटची निराशाजनक कामगिरी

तब्बल 7 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेला विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्याच्या पुनरागमनामुळे चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र, या मालिकेतील पहिल्या दोन्ही वन-डे सामन्यांमध्ये विराटने कोट्यवधी चाहत्यांची निराशा केली. पहिल्या आणि दुसऱ्या वन-डेमध्ये विराट सलग दोन वेळा 'शून्य' (0) धावांवर बाद झाला.

विशेषतः, ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही विराट शून्यावर बाद झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. कारण ॲडलेड मैदानावर विराटचा फॉर्म नेहमीच चांगला राहिला आहे. सलग दोन वन-डेमध्ये शून्यावर बाद झाल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.

माजी खेळाडूच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण


विराटच्या या अपयशानंतर, त्याने टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतल्यामुळे, आता वन-डे क्रिकेटमधूनही निवृत्त होण्याची चर्चा सुरू झाली. सामान्य चाहत्यांसोबतच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईक हसी (Mike Hussey) यानेही एक धक्कादायक वक्तव्य केले. "आपण विराटची ऑस्ट्रेलियामधील शेवटची इनिंग पाहिली का?" असा प्रश्न त्याने सामन्याची कॉमेंट्री करत असताना विचारला, ज्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आले. 

सोशल मीडियावरील खोटा दावा आणि व्हिडिओ व्हायरल

माईक हसी यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. @PrimeKohli नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यात असा दावा करण्यात आला की, विराट कोहली आपला मुलगा अकायच्या शाळेतील पालक-शिक्षक भेटीत उपस्थित राहण्यासाठी लंडनला जात आहे आणि तो तिसऱ्या वन-डेनंतर संघात परत सामील होईल.

या हँडलने आपल्या या दाव्याला पीटीआय (PTI) या प्रमुख वृत्तसंस्थेचा दाखला दिला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

( नक्की वाचा : Mohammad Rizwan: रिझवानला पॅलेस्टाईन समर्थन भोवले? धार्मिक कट्टरतेमुळे कॅप्टन्सी गेली; कोचवर थेट आरोप, Video )
 

पीटीआयच्या पत्रकाराकडून लगेच खुलासा

हा व्हिडिओ आणि त्यासोबतचा दावा व्हायरल होताच, पीटीआयचे (PTI) पत्रकार कुशन सरकार यांनी तातडीने त्यावर खुलासा केला. त्यांनी स्पष्ट केले की हे ट्विट आणि त्यातील माहिती पूर्णपणे खोटी आहे.

#खोट्या_बातमीचा_इशारा (FakeNewsAlert). तुम्हाला विनोद करायचा असेल आणि चांगला वेळ घालवायचा असेल, तर प्रसिद्धी (Reach) मिळवण्यासाठी खोटे संदर्भ देऊ नका. @PTI_New ने अशी कोणतीही बातमी प्रकाशित केलेली नाही. असं ट्विट कर सरकार यांनी सत्य सांगितलं आहे.

कोहली ऑस्ट्रेलिया दौरा सोडणार नाही
कुशन सरकार यांच्या या स्पष्टीकरणामुळे, विराट कोहलीबद्दल सोशल मीडियावर केला जात असलेला दावा पूर्णपणे खोटा (Fake) असल्याचे सिद्ध झाले. विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून कुठेही जाणार नाही आणि तो तिसरा वन-डे सामना देखील खेळणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

या 'फॅक्ट चेक'नंतर, आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष तिसऱ्या वन-डे सामन्याकडे लागले आहे. पहिल्या दोन सामन्यांतील मोठे अपयश पुसून टाकण्यासाठी विराट या तिसऱ्या सामन्यात दमदार खेळी करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com