मानसी पिंगळे, प्रतिनिधी
IND vs AUS Pink ball Test match: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच शुक्रवारपासून (6 डिसेंबर) अॅडलेडमध्ये सुरु होत आहे. ही टेस्ट डे-नाईट होणार असून पिंक बॉलनं खेळली जाणार आहे. टीम इंडियानं आत्तापर्यंत चार वेळा डे-नाईट टेस्ट मॅच खेळली आहे. त्यामध्ये तीन वेळा विजय मिळवलाय. तर एकामध्ये पराभव सहन करावा लागलाय. तर, ऑस्ट्रेलियानं 12 डे-नाईट टेस्ट मॅच खेळल्या असून त्यामधील 11 जिंकल्या आहेत. तर एकामध्ये त्यांचा पराभव झाला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटची डे-नाईट टेस्ट मार्च 2020 मध्ये अॅडलेडमध्ये झाली. त्यामध्ये टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव झाला होता. त्या टेस्टमध्ये भारतीय टीम दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 36 रनवर ऑल आऊट झाली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट संपूर्ण माहिती (All you need to know for the Border-Gavaskar day-night Test)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी टेस्ट कधी आहे?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट 6 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील दुसरी टेस्ट कुठं खेळली जाईल?
पाच मॅचच्या टेस्ट सीरिजमधील दुसरी टेस्ट अॅडलेड ओव्हलवर खेळली जाईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट किती वाजता सुरु होईल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. ही पिंक बॉल /डे-नाईट टेस्ट आहे.
( नक्की वाचा : 'मी रिलेशनशिपमध्ये होते पण...' मिताली राजनं सांगितलं लग्न न करण्याचं कारण, पाहा Video )
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह मॅच टीव्ही आणि ऑनलाईन कुठं पाहता येईल?
या मॅचचं थेट प्रक्षेपण भारतामध्ये स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येणार आहे. तर डिस्नी+ हॉटस्टार अॅपवर ही मॅच ऑनलाईन पाहता येईल. या मॅचचा अपडेट स्कोअर आणि विश्लेषण तुम्हाला ' NDTV मराठी' च्या वेबसाईटवरही पाहता येईल.
कशी असेल प्लेईंग 11 ?
या सीरिजमधील पहिली टेस्ट पर्थमध्ये झाली होती. ती टेस्ट टीम इंडियाचा नियमित कॅप्टन रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे खेळू शकला नव्हता. तर शुबमन गिल दुखापतीमुळे बाहेर होता. रोहित आणि गिल दोघंही दुसऱ्या टेस्टमध्ये परतणार आहेत. देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांच्या जागी त्यांचा प्लेईंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : IPL 2025 : KKR चा नवा कॅप्टन कोण? श्रेयसनंतर पुन्हा मुंबईकरच करणार नेतृत्त्व? )
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेट किपर), रोहित शर्मा (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world