IND Vs ENG Test Match: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण?

भारतीय खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व्यतिरिक्त इतर कोणालाही टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये क्वचितच परवानगी मिळते. अशा परिस्थितीत, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये एका मुलीला पाहिल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

India Vs England Test Match : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या हेडिंग्ले कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे. दरम्यान टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक मिस्ट्री गर्ल दिसली आहे. त्यानंतर सर्वांनाच ही मुलगी कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

भारतीय खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व्यतिरिक्त इतर कोणालाही टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये क्वचितच परवानगी मिळते. अशा परिस्थितीत, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये एका मुलीला पाहिल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

(नक्की वाचा-  KL Rahul Record: इंग्लडमध्ये केएल राहुलचा ऐतिहासिक कारनामा ! शतकी खेळीने जुने रेकॉर्ड उध्वस्त)

भारतीय ड्रेसिंग रूममध्ये दिसलेल्या या मिस्ट्री गर्लबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र ती संघाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांपैकी एक असावी असा अंदाज आहे. ऋषभ पंत आणि शुभमन गिलच्या शतकादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये टाळ्या वाजवताना आणि सेलिब्रेशन करताना ही मुलगी दिसली होती. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या मुलीची झलक दिसून आली.

(नक्की वाचा- Dilip Doshi Death: टीम इंडियाच्या जिगरबाज खेळाडूचे निधन! फ्रॅक्चर पायाने गोलंदाजी ते 898 बळीचा केलेला विक्रम )

India Vs England सामन्यात काय घडलं?

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांच्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. इंग्लंडच्या पहिल्या डावात 465 धावांपर्यंत मजल मारली. भारताच्या दुसऱ्या डावात, केएल राहुल व्यतिरिक्त, ऋषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर 364 धावा केल्या. चौथ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 21 धावा केल्या होत्या. इंग्लंड अजूनही भारतापेक्षा 350 धावा मागे आहे.

Advertisement
Topics mentioned in this article