
India Vs New Zealand Final Champion's Trophy 2025: भारत आणि न्यूझीलंडमध्ये होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाच्या फिरकीपुढे लोटांगण घालताना पाहायला मिळाला. वरुण चक्रवर्ती, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीने किवींज फलंदाजांना रोखले. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला. टीम इंडियापुढे 252 धावांचे लक्ष ठेवले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या. मायकेल ब्रेसवेलने 40 चेंडूत 53 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार लागले. तर डॅरिल मिशेलने 101 चेंडूत 63 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले. त्याचबरोबर रचिंद्र रविनने 37 धावा केल्या.
Innings Break!
— BCCI (@BCCI) March 9, 2025
Clinical bowling effort from #TeamIndia bowlers as they restrict New Zealand to a total of 251/7 in the Finals of the Champions Trophy!
Scorecard - https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/F4WmHJ4wJR
सामन्याची संथ सुरुवात केल्यानंतर किवींच्या फलंदाजांन अचानक गियर बदलले आणि चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली आणि दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली, परंतु त्यानंतर, वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडच्या फलंदाजीला रोखण्यासाठी विल यंगला एलबीडब्ल्यू केले. त्यानंतर कुलदीप यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याने पहिल्या षटकात रचिन रविंद्रला आणि दुसऱ्या षटकात केन विल्यमसनला बाद केले. टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादवने प्रत्येकी 2 तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने 1 बळी घेतला.
दोन्ही संघाची प्लेईंग 11:
भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडचा संघ: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क, नाथन स्मिथ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world