
Asia Cup 2025 Final : भारतानं पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप 2025 स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. या पराभवानंतरही पाकिस्तानचा रडीचा डाव सुरुच आहे. टीम इंडियाच्या ळाडूंनी एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर नक्वी ती ट्रॉफी घेऊन हॉटेलच्या खोलीत परतले होते. आता नक्वी यांनी यांनी भारताला ट्रॉफी देण्याची तयारी दर्शवली आहे, पण त्यासाठी त्यांनी एक विशेष अट ठेवली आहे.
काय आहे नवी अट?
क्रिकबझच्या (Cricbuzz) रिपोर्टनुसार, ACC चे अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतीय संघाला ट्रॉफी देण्यासाठी तयार आहेत, पण त्यांनी एक अट ठेवली आहे. नक्वी यांनी भारतीय खेळाडूंना पदके स्वतःच्या हातांनी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांची इच्छा आहे की, यासाठी एक 'औपचारिक समारंभ' आयोजित केला जावा आणि "मी स्वतः पदके आणि ट्रॉफी टीम इंडियाच्या खेळाडूंना माझ्या हातांनी देईन." तथापि, भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध पाहता, अशी कोणतीही व्यवस्था होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
( नक्की वाचा : 27 सेंच्युरी, 7885 रन्स! तरीही दुर्लक्ष का? टीम इंडियाच्या 'चक्रव्युहा'त अडकला 'अभिमन्यू' )
यापूर्वी, बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी ट्रॉफी आणि पदके हॉटेलच्या खोलीत घेऊन जाणाऱ्या नक्वी यांच्यावर टीका केली होती. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयला (ANI) सांगितले होते, "आम्ही ACC अध्यक्षांकडून, जे पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत, त्यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही ती त्यांच्याकडून स्वीकारणार नाही."
त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, बीसीसीआयने या प्रकरणाची तक्रार आयसीसीकडे (ICC) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पुढे म्हटले, "याचा अर्थ असा नाही की ते पदकांसह ट्रॉफी देखील आपल्यासोबत घेऊन जातील. हे अत्यंत दुर्दैवी असून खेळ भावनेच्या (Sportsmanship) विरोधात आहे."
Big Breaking 🚨🚨
— Globally Pop (@GloballyPop) September 28, 2025
Team India refuses to accept the Asia Cup 2025 Trophy 🏆 from Pakistan interior minister and ACC Chairman Mohsin Naqvi.
Someone just picked up the trophy and walked off the ground.
Another Embarrassing Moment for 🇵🇰
Video 📷#INDvsPAK #AsiaCupFinal #Tilak pic.twitter.com/h4CrRZgcUF
बीसीसीआयची ठाम भूमिका आणि पाकिस्तानचा रोजचा रडीचा डाव यामुळे अडकलेला आशिया चषक भारतात कधी येणार याकडं फॅन्सचं लक्ष लागलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world