जाहिरात

IND vs ZIM: 11 वर्षापूर्वीचा तो योगायोग, संजू सॅमसन गेम फिरवणार? टीम इंडियात मोठे बदल होणार?

IND vs ZIM T20 World Cup 2026: झिम्बाब्वेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला मोठ्या फरकाने विजयाची गरज आहे.

IND vs ZIM: 11 वर्षापूर्वीचा तो योगायोग, संजू सॅमसन गेम फिरवणार? टीम इंडियात मोठे बदल होणार?

IND vs ZIM T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीचा सर्वात महत्त्वाचा सामना आज संध्याकाळी 7 वाजता चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाची उपांत्य फेरीची वाट खडतर झाली आहे. आता झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय मिळवून नेट रन-रेट सुधारण्याचे आव्हान सूर्यकुमार यादव आणि कंपनीसमोर आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा संजू सॅमसन याच्यावर खिळल्या आहेत.

11 वर्षांचा संघर्ष आणि 'ती' आठवण

संजू सॅमसनसाठी झिम्बाब्वेविरुद्धचा हा सामना म्हणजे पुनरागमन आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहे. संजूने 19 जुलै 2015 रोजी झिम्बाब्वेविरुद्धच आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीची सुरुवात केली होती. गेल्या 11 वर्षांपासून संघात ये-जा करणाऱ्या संजूला पुन्हा एकदा त्याच संघाविरुद्ध आपली जागा पक्की करण्याची संधी चालून आली आहे. संजूने 58 टी-20 सामन्यांच्या 50 डावांत 3 शतके आणि 3 अर्धशतकांसह 1100 धावा केल्या आहेत.

(नक्की वाचा-  Rinku Singh News: टीम इंडियाला मोठा धक्का! रिंकू वर्ल्ड कप सोडून अचानक घरी परतला)

फलंदाजीतील चिंता आणि संघात बदल

भारतीय संघाची फलंदाजी सध्या चिंतेचा विषय ठरली आहे. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह हे युवा फलंदाज अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे तिघेही फ्लॉप ठरले होते. त्यामुळे या तिघांपैकी एकाच्या जागी संजू सॅमसनचा समावेश होऊ शकतो. संजू केवळ सलामीलाच नाही तर मधल्या फळीतही आक्रमक फलंदाजी करण्यास सक्षम आहे.

(नक्की वाचा- T20 World Cup 2026: 'विंडिज'च्या विजयामुळे पाँईंटटेबलमध्ये उलटफेर! भारत टेंशनमध्ये; सेमीफायनलची समीकरणे बदलली)

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग-11

भारत- ईशान किशन, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com