भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 22 डिसेंबरपासून सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship) फायनल गाठण्यासाठी टीम इंडियानं ही सीरिज मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे. पर्थमध्ये होणाऱ्या या सीरिजमधील पहिली टेस्ट सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील बॅटर शुबमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त झालाय. गिलच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. तो पहिली टेस्ट खेळण्याची शक्यता कमी आहे.
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या इंट्रा स्क्वाड मॅचमधील दुसऱ्या दिवशी फिल्डिंग करताना गिल जखमी झाला. त्याचा अंगठा चांगलाच दुखावला. त्यामुळे त्यानं तातडीनं स्कॅन करण्यासाठी मैदान सोडलं. गिलचा डावा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. पहिली टेस्ट मॅच सुरु होण्यासाठी सात दिवसांपेक्षा कमी वेळ शिल्लक असल्यानं तो पर्थ टेस्ट खेळण्याची शक्यता आहे.
अंगठ्याला झालेलं फ्रॅक्चर भरुन निघण्यासाठी साधारण 14 दिवस लागतात. या सीरिजमधमधील दुसरी टेस्ट 6 डिसेंबर रोजी अॅडलेडमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे तो या टेस्टपूर्वी फिट होण्याची शक्यता अधिक आहे.
( नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन! )
टीम इंडियाला मोठा धक्का
रोहित शर्मा पहिली टेस्ट खेळणार नसल्यानं टीम इंडियासाठी गिलची भूमिका निर्णायक ठरणार होती. सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये नियमितपणे 3 नंबरला खेळणारा गिला ओपनिंगला खेळवण्याचा टीम मॅनेजमेंटचा विचार होता. पण, तो जखमी झाल्यानं टीम इंडियाला धक्का बसलाय.
केएल राहुल हा देखील ओपनिंगसाठी आणखी एक पर्याय आहे. पण, इन्ट्रास्क्वाड मॅचच्या पहिल्या दिवशी राहुल जखमी झाला. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी फिल्डिंगला उतरला नाही. त्यामुळे आता अभिमन्यू इश्वरन हा पर्याय टीम इंडियाकडं ओपनिंगसाठी उपलब्ध आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world