जाहिरात

T20 World Cup: 'या' सामन्यावर कोट्यवधी चाहत्यांची नजर, विंडिजने आफ्रिकेला हरवल्यास भारतापुढे 'हा' एकमेव पर्याय

गुरुवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्या सामन्याचा विजेता संघ थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरेल आणि त्याचबरोबर भारताच्या सेमीफायनलचं संपूर्ण गणितही स्पष्ट होईल.

T20 World Cup: 'या' सामन्यावर कोट्यवधी चाहत्यांची नजर, विंडिजने आफ्रिकेला हरवल्यास भारतापुढे 'हा' एकमेव पर्याय
T20 World Cup 2026 Semifinal Calculation

West Indies vs South Africa T20 World Cup: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी झालेल्या या सामन्यात कोट्यवधी चाहत्यांची पदरात निराशा पडली. भारताच्या या पराभवानंतर आता उपांत्य फेरीच्या (सेमीफायनल) समीकरणात मोठा बदल झाला. गुरुवारी याच मैदानावर आणखी एक सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीजच्या या सामन्याकडेही कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष लागलं आहे. कारण यानंतरच भारताच्या सेमीफायनलची स्थिती पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. सुपर-8 टप्प्यात ग्रुप स्टेजचे चार सामने शिल्लक आहेत. यापैकी उद्या दोन सामने होणार आहेत. गुरुवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्या सामन्याचा विजेता संघ थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरेल आणि त्याचबरोबर भारताच्या सेमीफायनलचं संपूर्ण गणितही स्पष्ट होईल.

जर वेस्ट इंडीज जिंकली, तर कसं असेल समीकरण?

जर वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेला हरवले, तर त्यांचे 4 गुण होतील. अशा परिस्थितीत त्यांचा संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय होण्याच्या अगदी जवळ पोहोचेल. त्यांचा नेट रन रेट आधीच खूप चांगला आहे. वेस्ट इंडीजचा संघ जिंकला तर नेट रन रेटचे गणित पूर्णपणे बदलून जाईल. दक्षिण आफ्रिकेने त्यांचा शेवटचा सामना जिंकला, तर त्यांचेही 4 गुण होतील. सध्या दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट +3.800 असा आहे.

नक्की वाचा >> T20 World Cup 2026 : भारताचा पराभव अन् विंडिजचा विजय..वर्ल्डकपमध्ये उलथापालथ, कोण कोण गाठणार सेमी फायनल?

अशा परिस्थितीत भारताला झिम्बाब्वे आणि नंतर वेस्ट इंडीजला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल, जेणेकरून त्यांचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला होईल आणि भारत सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल. भारताला झिम्बाब्वेला 100 पेक्षा अधिक धावांनी हरवावे लागेल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनेही झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारताकडे दक्षिण आफ्रिकेला नेट रन रेटमध्ये मागे टाकण्याचे स्पष्ट समीकरण तयार होईल.

नक्की वाचा >> Indian Railway: ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, 1 मार्चपासून IRCTC विसरा, 'या' APP वर करा बुकिंग

जर दक्षिण आफ्रिका जिंकली, तर काय होईल?

 दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकणे ही भारतासाठी आनंदाची बातमी ठरेल. दक्षिण आफ्रिका जिंकली आणि त्यानंतर भारताने झिम्बाब्वेला पराभूत केले, तर झिम्बाब्वे सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जाईल. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका सेमीफायनलसाठी क्वालिफाय करेल. ग्रुप ए मधून सेमीफायनलमध्ये पोहोचणारी दुसरी टीम कोण असेल, याचा निर्णय भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या सामन्यातून होईल. या सामन्याचा विजेता संघ थेट सेमीफायनलचे तिकीट मिळवेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com