भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England T20 Series) यांच्यातील T20 सीरिजला सुरुवात झाली आहे. कोलकातामधील पहिल्या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष भारताचा अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमीकडं होतं. शमीनं 2023 चा वन-डे वर्ल्ड कप गाजवला होता. पण, त्यानंतर तो दुखापतीमुळे टीमच्या बाहेर होता. वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच त्याची टीममध्ये निवड करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शमीची बॉलिंग पाहण्याची उत्सुकता असलेल्या सर्व फॅन्सची कोलकातामध्ये निराशा झाली. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. टॉसनंतर टीम इंडियाची प्लेईंग 11 जाहीर झाली. त्यामध्ये मोहम्मद शमीचं नाव नसल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
आम्ही आमच्या शक्तीस्थानाच्या आधारे या मॅचमध्ये उतरलो आहोत, असं कॅप्टन सूर्यकुमार यादवनं स्पष्ट केलं. टीम इंडियानं प्लेईंग 11 मध्ये व्हाईस कॅप्टन अक्षर पटेलसह रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती असे तीन स्पिनर खेळवले. त्यामुळे मोहम्मद शमीला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली नाही.
नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील शेवटच्या दोन टेस्टमध्ये शमीचा टीममध्ये समावेश होणार अशी चर्चा होती. पण, तेंव्हाही त्याला निराशा सहन करावी लागली होती. शमी पूर्ण फिट नसल्याचं तेंव्हा सांगण्यात आलं होतं. पण, कोलकाता टी20 मध्ये टीममध्ये असूनही प्लेईंग 11 मध्ये समावेश न झाल्यानं शमीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
( नक्की वाचा : IND vs ENG : कॅप्टन सूर्या इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर, कुणालाही जमलं नाही ते करणार? )
टीम इंडियाचा प्रमुख बॉलर जसप्रित बुमराह सध्या दुखापतग्रस्त आहे. तो 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फिट होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापाठोपाठ शमीच्या फिटनेसवरही संभ्रम निर्माण झाला आहे.
भारतीय बॉलर्स चमकले
अर्थात कोलकाताधील सामन्यात भारतीय बॉलर्सना शमीची अनुपस्थिती जाणवली नाही. अर्शदीप सिंगनं पहिल्याच ओव्हरमध्ये यजमानांना यश मिळवून दिलं. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी ठराविक अंतरानं विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंडची पहिली इनिंग 132 रन्सवरच संपुष्टात आली.
टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्तीनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलनं यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या. इंग्लंडकडून कॅप्टन जोस बटलरनं एकाकी लढत देत 68 रन्स केले. हॅरी ब्रुकनं 17 तर जोफ्रा आर्चरनं 12 रन काढले. इंग्लंडच्या उर्वरित 8 बॅटर्सना दोन अंकी स्कोअर करता आला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world