जाहिरात

Rohini Kalam : आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, भारताची स्टार खेळाडू रोहिणी कलमने राहत्या घरात घेतला गळफास

रोहिणीने अबुधाबीमध्ये आठव्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

Rohini Kalam : आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, भारताची स्टार खेळाडू रोहिणी कलमने राहत्या घरात घेतला गळफास

Rohini Kalam Death : आंतरराष्ट्रीय जुजुत्सु खेळाडू आणि मार्श आर्ट कोच रोहिणी कलम हिने रविवारी 26 ऑक्टोबरला मध्यप्रदेशातील देवास स्थित आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आबे. जुजुत्सु (Jujutsu game) खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणारी रोहिणी कलाम आपल्या घरात मृतावस्थेत आढळली. ३५ वर्षीय कलम हिच्या मृत्यूमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. 

भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल

रोहिणीने अबुधाबीमध्ये आठव्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. शिवाय ती एका शाळेत मार्शल आर्ट कोच म्हणून काम करीत होती. कामामुळे ती तणावात असल्याची माहिती आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत सर्व ठीक होतं. रोहिणीने सर्वांसोबत नाश्ता केला. त्यानंतर तिला एक कॉल आला. कॉल आल्यानंतर ती आपल्या खोलीत निघून गेली आणि आतून दार बंद केलं. बराच वेळ ती खोलीच्या बाहेर आली नाही. आतून आवाजही येत नव्हता. म्हणून तिची लहान बहीण रोशनी कलमने दार ठोठावलं. आतून आवाज न आल्याने तिने दार तोडलं. दार उघडताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रोहिणी खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. यानंतर रोहिणीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

Shreyas Iyer Health: रक्तस्त्राव, बीपी लो, पुढील 48 तास.. श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

नक्की वाचा - Shreyas Iyer Health: रक्तस्त्राव, बीपी लो, पुढील 48 तास.. श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

IPS होण्याची इच्छा अपूर्णच राहिली...

घटनास्थळावरुन पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. रोहिणी कलम एक आंतरराष्ट्रीय जुजुत्सु खेळाडू होती. तिने २००७ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. २०२४ मध्ये अबुधाबीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय जुजुत्सु स्पर्धेत तिने कांस्य पदक पटकावलं होतं. सध्या ती एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच म्हणून काम करीत होती. रोहिणीला आयपीएस अधिकारी व्हायचं होतं. दोन वर्षांपासून ती विक्रम पुरस्कारासाठी प्रयत्न करीत होती. कामाच्या ठिकाणी तिच्यावर दबाव होता. ती लग्नाची स्थळंही नाकारत होती. पाच महिन्यांपूर्वी एका मोठ्या सर्जरीनंतर ती अनेक शारिरीक आजारांचा सामना करीत होती, अशी माहिती रोहिणीच्या वडिलांनी दिली. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com