जाहिरात

सुनील नारायण इतिहास रचणार? 18 धावा करताच ही कामगिरी करणारा ठरेल एकमेव खेळाडू

सुनील नारायणचा आज वाढदिवस देखील आहे. केकेआरसाठी आजचा दिवस खास असणार आहे. केकेआरने आजचा सामना जिंकला तर सुनील नारायणसाठी हे मोठं गिफ्ट असेल.

सुनील नारायण इतिहास रचणार? 18 धावा करताच ही कामगिरी करणारा ठरेल एकमेव खेळाडू

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर खेळाडू सुनील नारायण आयपीएलमध्ये ऐतिहासिक विक्रम करण्याच्या अगदी जवळ आहे. आजच्या सामन्यात सुनील नारायणने 18 धावा केल्या तर तो मोठ्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. 

आयपीएलच्या इतिहासात एका सीजनमध्ये 500 धावा आणि 15 विकेट घेणारा तो एकमेव खेळाडू ठरेल. सुनील नारायणने आतापर्यंत 482 धावा केल्या आहेत. संपूर्ण सीजनमध्ये त्याने ऑलराऊंडर कामगिरी केली आहे. कोलकाताचा संघ फायनलपर्यंत पोहोचण्यात सुनील नारायणचा सिंहाचा वाटा आहे. आता सुनील नारायणकडून आजच्या सामन्यात आणखी एका उत्तम खेळीची अपेक्षा आहे. 

(नक्की वाचा: IPL 2024: आयपीएल फायनलवर वादळाचं सावट, मॅच रद्द झाली तर कुणाला मिळणार ट्रॉफी?)

सुनील नारायणचा वाढदिवस

सुनील नारायणचा आज वाढदिवस देखील आहे. केकेआरसाठी आजचा दिवस खास असणार आहे. केकेआरने आजचा सामना जिंकला तर सुनील नारायणसाठी हे मोठं गिफ्ट असेल. सुनील नारायणने आयपीएलमध्ये आजपर्यंत एकूण 176 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 179 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय सुनील नारायणने 1528 धावा देखील केल्या आहेत. 

(नक्की वाचा: 5 कारणांमुळे गौतम गंभीर होऊ शकतो टीम इंडियाचा कोच)

चेन्नईत रविवारी खेळल्या जाणाऱ्या आयपीएल फायनलवर 'रेमल' वादळाचं सावट आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगलाच्या उपसागरावर निर्माण झालेल्या दबावामुळे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली. सध्या हे वादळ चेन्नईच्या पूर्वेला 1500 किलो मीटर अंतरावर स्थिर आहे. पण, या कारणामुळे चेन्नईच्या तापमानामध्ये फरक पडू शकतो. हवामान विभागांच्या अंदाजानुसार चेन्नईत मॅच दरम्यान ढगांचं सावट असेल. फायनल मॅचमध्ये पावसामुळे खेळात अडथळा आला तर बीसीसीआयनं त्यासाठी एक अतिरिक्त दिवस ठेवला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com