जाहिरात

IPL 2025 KKR vs RCB : स्टम्पला स्पर्श...बेल्सही पडले; तरीही सुनील नरीन बाद नाही? हे कसं शक्य आहे?

IPL 2025 KKR vs RCB : स्टम्पला स्पर्श...बेल्सही पडले; तरीही सुनील नरीन बाद नाही? हे कसं शक्य आहे?

IPL 2025 KKR vs RCB : आयपीएलच्या 18 व्या हंगामाची सुरुवात शनिवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानात झाली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला घरच्याच मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहली, फिल सॉल्ट यांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी आणि त्याला कर्णधार रजत पाटीदारने दिलेली उत्तम साथ या जोरावर RCB ने 175 धावांचं आव्हान 7 विकेट राखून पूर्ण केलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परंतु या सामन्यात कोलकात्याचा संघ बॅटींग करत असताना एक प्रकार घडला, ज्याची सोशल मीडियावर क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चा पहायला मिळाली. कोलकात्याचा संघ बॅटींग करत असताना सलामीवीर फलंदाज सुनील नरीनचा अनावधानाने स्टम्पला स्पर्श झाला आणि बेल्सही पडले...परंतु तरीही त्याला पंचांनी नाबाद ठरवलं.

जाणून घ्या, नेमकं घडलं तरी काय होतं?
RCB चा रसिख सलाम पहिल्या डावातली आठवी ओव्हर टाकत होता. अराऊंड द विकेट बॉलिंग करताना चौथा बॉल रसिख सलामने ऑफ स्टम्प बाहेर टाकला. ज्यामुळे हा बॉल अंपायरनी वाईड ठरवला. परंतु या बॉलवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात सुनील नरीनने जोरात बॅट फिरवली होती. याच प्रयत्नात सुनील नरीनचा स्पर्श स्टम्पला झाला आणि एक बेल्सही पडली. यानंतरही सुनील नरीनला नाबाद ठरवण्यात आलं.

IPL 2025: किंग कोहलीचे वादळ! RCBची विजयी सलामी, गतविजेत्या KKRचा पराभव

नक्की वाचा - IPL 2025: किंग कोहलीचे वादळ! RCBची विजयी सलामी, गतविजेत्या KKRचा पराभव

    काय आहे यामागचं कारण?
    सुनील नरीन नाबाद ठरवला जाण्याचं कारण म्हणजे अंपायरनी तो बॉल आधीच वाईड बॉल म्हणून घोषित केला होता. त्यामुळे अंपायरने वाईड बॉलची घोषणा केल्यानंतर तो बॉल ग्राह्य धरला जाणार नसल्यामुळे सुनील नरीनकडून अनावधानाने स्टम्पला झालेला स्पर्श बाद म्हणून ठरवला गेला नाही.

    हिट-विकेट संदर्भात नियम काय सांगतो?
    MCC च्या नियम क्रमांक 35.1.1 नुसार एखादा फलंदाज तेव्हाच हिट विकेट म्हणून घोषित केला जातो जेव्हा गोलंदाजाने बॉल टाकायची तयारी सुरु केल्यानंतर किंवा बॉल टाकेपर्यंतच्या कालावधीत फलंदाजाच्या बॅटचा किंवा शरिराच्या स्पर्शाने स्टम्प हे पडले जातात. सुनील नरीनच्या प्रकरणात अंपायरने स्टम्पला स्पर्श होण्याआधीच तो बॉल वाईड घोषित केला होता. ज्यामुळे तो बॉल ग्राह्य धरला जाणार नव्हता.

    KKR vs RCB: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा पहिल्याच मॅचमध्ये बोलबाला, षटकार ठोकत...

    नक्की वाचा - ​​​​​​​KKR vs RCB: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा पहिल्याच मॅचमध्ये बोलबाला, षटकार ठोकत...

    यानंतर सुनील नरीन हा सरतेशेवटी 44 धावांवर बाद झालाच आणि महत्त्वाची बाब म्हणजे रसिख सलामनेच त्याला बाद केली. सुनील नरीनने 26 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्स लगावत 44 रन्स केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची मजबूत भागीदारीही केली. गोलंदाजीतही सुनील नरीनने 1 विकेट घेतली.

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us: