कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात रविवारी झालेला सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला. केकेआरनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 आऊट 222 रन केले होते. आरसीबीनं 223 रनच्या टार्गेटचा निकारानं पाठलाग केला. पण, त्यांचे प्रयत्न 1 रननं कमी पडले. आरसीबीच्या पराभवापेक्षाही या मॅचमध्ये विराट कोहलीच्या विकेटची जोरदार चर्चा सुरु आहे. विराटनं अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्याला आऊट दिल्यानं अनेक क्रिकेट फॅन्स आश्चर्यचकित झाले होते. त्याचबरोबर आता माजी क्रिकेटपटूंमध्येही यावर जुंपली आहे.
विराट कसा आऊट झाला?
केकेआरचा फास्ट बॉलर हर्षित राणानं टाकलेल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. हर्षित राणानं फुलटॉस टाकलेला बॉल बॅट लागून वर उडाला. स्वत: हर्षितनंच पुढं पळत जात त्याचा कॅच घेतला. हर्षितचा फुलटॉस नो बॉल असेल असाच बहुतेकांचा अंदाज होता. पण, बॉल ट्रॅकिंग सिस्टिममध्ये तो वैध बॉल असल्याचं स्पष्ट झालं. थर्ड अंपायरनं विराटला आऊट म्हणून केलं. त्यानंतर विराटनं संतापत मैदान सोडलं.
( नक्की वाचा : RCB ची अखेरच्या ओव्हरपर्यंत झुंज, KKR ची 1 रननं बाजी )
इराफननं केलं समर्थन
भारताचा माजी फास्ट बॉलर इराफन पठाणनं थर्ड अंपायरनं दिलेल्या निर्णयाचं समर्थन केलंय. इरफाननं खास व्हिडिओ शेअर करत याबाबतचा नियम समजावून सांगितला आहे. 'बीसीसीआयनं आयपीएल 2024 मध्ये खेळत असलेल्या सर्व खेळाडूंच्या कंबरेची उंची मोजली आहे. इथं तोच डाटा वापरला जातोय. विराट क्रिजच्या थोडा पुढे उभा होता. बॉल फुलटॉस होता. तो बॉल थोडा फास्ट असता तर कंबरेच्या वर उसळला असता. पण, तो स्लो बॉल असल्यानं खाली राहिला. विराट क्रिजमध्ये उभा असता तर त्याच्या कंबरेची जी उंची मोजण्यात आली होती त्याच्यापेक्षा बॉल खाली राहिला असता. याचाच अर्थ हा वैध बॉल आहे. माझ्या मतानुसार तसंच नियमानुसार हा नो बॉल नव्हता.' असं इरफाननं सांगितलंय.
I hope this helps. #noball #legaldelivery pic.twitter.com/VZcW8rtsa5
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 21, 2024
इराफाननं व्हिडीओ करत या विषयावरची तांत्रिक बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफची पोस्ट सोशल मीडियावर व्हायल होत आहे. यामध्ये कैफनं विराट आऊट नसल्याचं म्हंटलं आहे. 'माझ्या मते हा चुकीचा निर्णय आहे. बॉल बॅटला लागवा तेंव्हा कंबरेपेक्षा वर असेल तर तो नो बॉल समजला पाहिजे. त्याचबरोबर बॉल ट्रॅकिंगमध्येही वेगानं खाली येत असल्याचं दिसत आहे,' असं कैफनं स्पष्ट केलंय.
My take on Virat Kohli dismissal: It's an unfair call. If the ball is waist high at the time bat meets ball it should ruled as no ball. Also I have always felt that the ball tracking shows a sharper dip.
— Mohammad Kaif (@MohammadKaif) April 21, 2024
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world