जाहिरात

Virat Kohli: विराट कोहलीचे Insta Account डीअ‍ॅक्टिव्हेट की सस्पेंड? प्रोफाइल गायब झाल्याने चाहत्यांमध्ये खळबळ

Virat Kohli Instagram Account Deactivate or Suspended: विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट गायब झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्यांच्याशी संबंधित हॅशटॅग्स सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होऊ लागले आहेत. नेमका काय आहे प्रकार?

Virat Kohli: विराट कोहलीचे Insta Account डीअ‍ॅक्टिव्हेट की सस्पेंड? प्रोफाइल गायब झाल्याने चाहत्यांमध्ये खळबळ
"Virat Kohli Instagram Account: विराट कोहलीच्या इन्स्टा अकाउंटचे नेमके काय आहे प्रकरण?"
IANS English And Virat Kohli Instagram

What Happened to Virat Kohli Instagram Account: स्टार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीशी संबंधित एका वृत्ताने सध्या मोठी खळबळ उडवून दिलीय. गुरुवारी (29 जानेवारी 2026) रात्रीपासून त्याचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट झाल्याचे नेटकऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे लाखो चाहत्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की हे प्रोफाइल डिलीट करण्यात आलंय, डीअ‍ॅक्टिव्ह केलंय की, तात्पुरते सस्पेंड करण्यात आलंय. कोहलीच्या व्हेरिफाइड इंस्टाग्राम हँडलला भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजर्सना "पेज उपलब्ध नाही" असा एरर मेसेज दिसत होता.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Virat Kohli Instagram

विराट कोहलीचे चाहते चिंतेत

अकाउंट गायब झाल्यानंतर काहीच मिनिटांत कोहलीशी संबंधित हॅशटॅग्स सर्व प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करू लागले आहेत. समर्थकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' आणि फॅन फोरम्सवर स्क्रीनशॉट्ससह विविध अंदाज शेअर करण्यास सुरुवात केलीय. यामध्ये सोशल मीडियापासून स्वेच्छेने घेतलेला ब्रेक, इंस्टाग्राममधील तांत्रिक बिघाड यासह अन्य शक्यतांचा समावेश आहे. काहींनी तर विराटचे अकाउंट हॅक झाल्याचाही अंदाज व्यक्त केलाय, पण अशा सर्व दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.

(नक्की वाचा: करिअरच्या शेवटी मला मानसन्मान मिळाला नाही, क्रिकेटच्या बादशाहचा गौप्यस्फोट, इतक्या वर्षांनंतर व्यक्त केलं दुःख)

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

आतापर्यंत या प्रकरणावर ना विराट कोहली ना त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. इंस्टाग्रामकडूनही हे अकाउंट पॉलिसी उल्लंघनामुळे हटवण्यात आलंय की प्लॅटफॉर्मवरील तांत्रिक अडचण आहे? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

अधिकृत माहिती कधी येणार समोर?

जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंमधील एक असलेल्या विराट कोहलीचं फॅन फॉलोइंग जगभरातील खेळाडूंमध्ये सर्वाधिक आहे. डिजिटल मीडियावरील त्याचा प्रभाव केवळ क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादित नाहीय, त्यामुळेच त्याचं अकाउंट अचानक गायब झाल्याच्या वृत्ताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. चाहत्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूकडून किंवा इंस्टाग्रामकडून स्पष्टीकरण येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com