जाहिरात
Story ProgressBack

रोहित शर्मा खरंच रडत होता? Viral Video पाहून फॅन्सना धक्का

Rohit Sharma Viral Video : मुंबईच्या विजयानंतरही रोहित शर्मा हताश दिसला. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Read Time: 2 min
रोहित शर्मा खरंच रडत होता? Viral Video पाहून फॅन्सना धक्का
Rohit Sharma : रोहित शर्माचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
मुंबई:

Rohit Sharma reaction viral MI Dugout Video: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) दमदार शतकाच्या जोरावर मुंबईनं सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सनं पराभव केला. मुंबईच्या विजयानंतरही रोहित शर्मा हताश दिसला. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यामध्ये हिट मॅन निराश दिसतोय. त्याचबरोबर तो रडतोय असं वाटतंय. रोहितचा हा व्हिडिओ पाहून फॅन्सला धक्का बसलाय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहित खरच रडत होता?

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल आहे. अर्थात रोहित खरंच रडत होता का? याबाबत नेमकी माहिती अजून समजलेली नाही. पण, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून फॅन्स सतत प्रतिक्रिया देत आहेत. 


मुंबई इंडियन्सनं सोमवारच्या सामन्यात 7 विकेट्सनं विजय मिळवला. पण, रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो फक्त 4 रन काढून आऊट झाला. रोहितनं या आयपीएलम सिझनमधील 12 मॅचमध्ये 330 रन केले आहेत. त्यानं चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 105 रनची नाबाद खेळी केली होती. या खेळीचा अपवाद वगळता त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. 

( नक्की वाचा : T20 वर्ल्ड कपमध्ये निवड होताच घसरला खेळ, रोहित ते अर्शदीप सारे फेल )

मुंबई इंडियन्सनं सोमवारच्या सामन्यात सनरायझर्सला 8 आऊट 173 रनवर रोखलं होतं.  मुंबईकडून हार्दिर पांड्या आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. 174 रनचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची अवस्था 3 आऊट 31 झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव (नाबाद 102) आणि तिलक वर्मा (नाबाद 37) यांनी चौथ्या विकेटसाठी 143 रनची नाबाद भागिदारी करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination