जाहिरात
Story ProgressBack

राजस्थाननं मॅच जिंकली तर शाहरुखनं मन! पाहा मैदानावरचा इमोशनल Video

Shah Rukh Khan IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात मंगळवारी (16 एप्रिल) रोजी झालेला सामना चांगलाच चुरशीचा झाला.

Read Time: 2 min
राजस्थाननं मॅच जिंकली तर शाहरुखनं मन! पाहा मैदानावरचा इमोशनल Video
Shah Rukh Khan : शाहरुख खानची कृती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली.
कोलकाता:

Shah Rukh Khan IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात मंगळवारी (16 एप्रिल) रोजी झालेला सामना चांगलाच चुरशीचा झाला. या सामन्यात जोस बटलरच्या  (Jos Buttler) शतकामुळे राजस्थाननं शेवटच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. केकेआरनं पहिल्यांदा बॅटिंग करत 6 आऊट 223 रन केले होते. मोठा स्कोअर केल्यानंतरही त्यांना सामना गमवावा लागला. या मॅचनंतर केकेआरचा मालक आणि अभिनेता शाहरुख खाननं केलेली कृती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.  

राजस्थान रॉयल्सकडून जॉस बटलरनं विजयी फटका लगावत त्याच्या टीमला विजय मिळवून दिला. शेवटपर्यंत निकारानं प्रयत्न केल्यानंतरही पराभव झाल्यानं केकेआरचे खेळाडू निराश झाले होते. त्यावेळी शाहरुख खान खेळाडूंच्या जवळ गेला. त्यानं स्वत:च्या टीमच्या खेळाडूंना मिठी मारली. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंकडं गेला. त्यानं मैदानातच जोस बटलरची गळाभेट घेतली. 

शाहरुख खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक युझर्स त्याची या कृतीबद्दल प्रशंसा करत आहेत. 'जी एसआरके फॅन' या हँडलवरुन X वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. केकेआरच्या पराभवानंतरही शाहरुख खान सर्व खेळाडूंना भेटला. याला म्हणतात मोठं मनं. तो अतिशय कणखर आणि धैर्यशाली व्यक्ती आहे. शाहरुख खाननं बटलरची गळाभेट घेतली. तो खरोखरच सर्वात नम्र सुपरस्टार आहे.

धोनी, शास्त्री आणि वानखेडे! पुन्हा जागा झाला 13 वर्षांपूर्वीचा इतिहास, Video

शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनं या आयपीएल सिझनमध्ये आत्तापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 जिंकले असून 2 गमावले आहेत. केकेआरला आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा कॅप्टन गौतम गंभीर यंदा टीमचा मेंटॉर आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआर स्पर्धेत आक्रमक खेळ करत आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination