जाहिरात

IPL 2025: 13 वर्षांच्या वैभवची तुफान फटकेबाजी, इतर खेळाडू बघतच राहिले

Vaibhav Suryavanshi in IPL 2025: वैभवने ट्रायलनंतर राजस्थान रॉयल्ससोबत करारबद्ध झाला आहे. ट्रायलमध्ये दबावाच्या स्थितीत तीन षटकार आणि टीमच्या कोचिंग स्टाफला प्रभावित करुन वैभवने संघात जागा मिळवली आहे.

IPL 2025: 13 वर्षांच्या वैभवची तुफान फटकेबाजी, इतर खेळाडू बघतच राहिले

राजस्थान रॉयल्सने 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला आपल्या संघात सामील करुन घेतलं आहे. वैभव आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल. यंदाचा आयपीएलचा सीजन वैभवसाठी महत्त्वाचा असणार आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली वैभव जोरदार सराव करत आहे. त्याचा एक सराव सत्राचा व्हिडीओ समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सरावादरम्यान वैभवची धडाकेबाज बॅटिंग बघून सगळे चकीच झाले. 13 वर्षांच्या वैभवची बॅटिंग पाहून त्याच्या वयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये काहीतरी कमाल होणार असे अंदाज बांधले जात आहेत. 

आयपीएलचा मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने वैभवला 10 लाखांना खरेदी केले. वैभवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर 19 सामन्यात 62 चेंडूत 104 धावा करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यूथ क्रिकेटमध्ये हे दुसरे सर्वात जलद शतक होते. 

(नक्की वाचा- IPL Most Sixes: ना रोहित ना कोहली, IPL मध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचे रेकॉर्ड कुणाच्या नावावर?)

वैभवचं वय कमी असलं तरी तो बिहारसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला आहे. विजय हजारे ट्रॉफी 2024 मध्ये 42 चेंडूत 72 धावांची विजयी खेळी केली होती. वैभव भारताकडून सर्वात कमी वयात 'लिस्ट ए'मध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. 

राजस्थान प्लेईंग 11 मध्ये संधी मिळणार का?

वैभवने ट्रायलनंतर राजस्थान रॉयल्ससोबत करारबद्ध झाला आहे. ट्रायलमध्ये दबावाच्या स्थितीत तीन षटकार आणि टीमच्या कोचिंग स्टाफला प्रभावित करुन वैभवने संघात जागा मिळवली आहे.  मात्र यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन या सलामी जोडी आणि संघातील इतर अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीत वैभवला संधी मिळते का हा प्रश्न आहे. वैभवला संघात प्लेईंग 11 मध्ये जागा मिळू शकते, मात्र सुरुवातीच्या सामन्यांमध्ये हे शक्य होणार नाही. 

(नक्की वाचा- Virat Kohli : T20I क्रिकेटमधील निवृत्ती मागं घेण्यास विराट तयार, टीमसमोर ठेवली खास अट)

IPL 2025 साठी राजस्थान रॉयल्सचे (RR) खेळाडू

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महीष तीक्ष्णा, वानिंदु हसारंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, नीतीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, युद्धवीर सिंह, फजलहक फारूकी, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, कुणाल राठोड, अशोक शर्मा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: