जाहिरात

IPL 2025 : आयपीएल सुरु होण्याआधाची दिल्लीला मोठा धक्का, मिचेल स्टार्क परतणार नाही

IPL 2025: स्पर्धेतील 58 सामन्यांनंतर, दिल्ली कॅपिटल्स 11 सामन्यांपैकी सहा जिंकून आणि चार पराभवानंतर 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

IPL 2025 : आयपीएल सुरु होण्याआधाची दिल्लीला मोठा धक्का, मिचेल स्टार्क परतणार नाही

भारत-पाकिस्तान तणावामुळे पुढे ढकलण्यात आलेला आयपीएलचा 18 वा हंगाम पुन्हा सुरू होत आहे. उर्वरित सामने 17 मे ते 3 जून दरम्यान निवडक ठिकाणी खेळवले जातील. स्पर्धा पुन्हा सुरू होण्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्स संघाला धक्का बसला आहे.TOI च्या वृत्तानुसार, मिचेल स्टार्क आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी दिल्ली कॅपिटल्स संघात परतणार नाही. त्यानंतर फ्रँचायझीसह चाहत्यांना धक्का बसला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयपीएलच्या चालू हंगामात मिचेल स्टार्कची कामगिरी आतापर्यंत कौतुकास्पद राहिली आहे. दिल्ली संघात आतापर्यंतच्या त्यांचा कामगिरी निर्णायक राहिली आहे. अशा परिस्थितीत तो पुन्हा भारतात परतणार नाही. त्यामुळे दिल्ली आणि त्याचे चाहते निराश झाले आहेत. 

(नक्की वाचा-  Prithvi Shaw : IPL मध्ये पुन्हा मिळाला नाही भाव, पृथ्वी शॉचा रहस्यमयी पोस्टमधून काय इशारा?)

स्टार्क आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. यावर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा  गोलंदाज होता. त्याने दिल्लीसाठी 11  सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, त्याने 10 डावांमध्ये 26.14 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत. 35 धावांत पाच विकेट ही त्याची उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. 

पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली पाचव्या स्थानावर 

स्पर्धेतील 58 सामन्यांनंतर, दिल्ली कॅपिटल्स 11 सामन्यांपैकी सहा जिंकून आणि चार पराभवानंतर 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. पटेल आणि कंपनी उर्वरित सामने जिंकून पुन्हा एकदा टॉप-4 मध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरून ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतील. 

( नक्की वाचा : India Tour of England : शुबमन गिल नाही तर 'या' खेळाडूला टीम इंडियाचा कॅप्टन करा, गावस्करांचा सल्ला )

स्टार्कची आयपीएल कारकीर्द 

मिशेल स्टार्कच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने यात 52 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 50 डावांमध्ये 23.48 च्या सरासरीने 65 विकेट्स घेतल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com