जाहिरात

IPL 2025 Final : RCB चं टेन्शन खल्लास, इंग्लंडहून पहाटे परतला विराटचा सहकारी! बायको नाही टीमला प्राधान्य

IPL 2025 Final, RCB vs PBKS : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) साठी इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या फायनलपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी आहे.

IPL 2025 Final : RCB चं टेन्शन खल्लास, इंग्लंडहून पहाटे परतला विराटचा सहकारी! बायको नाही टीमला प्राधान्य
IPL 2025 Final : आरसीबीला आजवर एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही.
मुंबई:

IPL 2025 Final, RCB vs PBKS : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) साठी इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या फायनलपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या फायनलसाठी टीमचा महत्त्वाचा खेळाडू फिल सॉल्ट (Phil Salt) अहमदाबादमध्ये परतला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सॉल्ट कुठे होता?

फायनलच्या  आदल्या दिवशी सॉल्ट RCB च्या सराव सत्रात नव्हता, कारण तो आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी त्याच्या जोडीदारासोबत घरी परतल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे सॉल्ट फायनल खेळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला होता. पण, तो पहाटे अहमदाबादला परतला आहे. मंळवारी सकाळी टीममध्ये दाखल झालाय. बाळ जन्माला आल्यानंतर बायकोसोबत जास्त काळ न राहता तो टीममध्ये परतलाय. सॉल्टनं  फ्रँचायझीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.

( नक्की वाचा : IPL 2025 Final LIVE, RCB vs PBKS : फायनल मॅचमध्ये पावसाचा किती अडथळा? वाचा प्रत्येक तासाचा अंदाज )
 

सॉल्ट RCB साठी महत्त्वाचा प्लेयर आहे. त्यानं या सिझनमधील 12 मॅचमध्ये 387 रन्स केले आहेत. त्यामध्ये त्याचा स्ट्र्ाईक रेट तब्बल 175.90 इतका असून सरासरी 35.18 आहे. विराट कोहलीसोबत आरसीबीच्या इनिंगला वादळी सुरुवात करुन देण्याचं काम सॉल्टनं केलं आहे.

फिल सॉल्ट अहमदाबादमध्ये परतला असून तो फायनल खेळणार आहे, या वृत्त्ताला 'ईएसपीएनक्रिकइन्फोने' दुजोरा दिला आहे. 

( नक्की वाचा : IPL 2025 Final: पंजाब की बंगळुरु कुणाचं स्वप्न होणार पूर्ण? 5 खास योग निश्चित करणार चॅम्पियन )
 

RCB ची टीम नऊ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर IPL फायनलमध्ये दाखल झाली आहे. गेली 17 वर्ष आरसीबीला विजेतेपदानं हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदा या विजेतेपदावर नाव कोरण्याचं आरसीबीचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फिल सॉल्टनं देखील मोठा निर्णय घेत बाळाच्या जन्मानंतर तातडीनं अहमदबादला परतण्याचा निर्णय घेतला. तो आता फायनल खेळणार आहे,  

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळमाऱ्या RCB चं पारडं या मॅचमध्ये जड मानलं जात आहे. त्यांनी पहिल्या क्वालिफायरध्ये पंजाब किंग्जला 8 विकेट्सनं सहज पराभव करत थेट फायनल गाठली होती. तर पंजाब किंग्जने नंतर मुंबई इंडियन्सचा पराभव करत फायनल गाठली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com