
Shreys Iyer set eye on big record: या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2025) पंजाब किंग्जचा (PBKS) कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) एका वेगळ्याच रूपात दिसला आहे. त्याच्या बॅटिंगचा स्तर उंचावला आहे. त्याच्या प्रदर्शनात सातत्य आले आहे. पण त्याचबरोबर आणखी एक एक्स फॅक्टर त्याच्या बॅटिंगमध्ये निर्णायक ठरतोय. तो यंदा अगदी सहजपणे सिक्सर्स लगावतोय. नुकत्याच झालेल्या क्वालिफायर 2 मध्ये श्रेयसनं फोर पेक्षा सिक्स जास्त मारले होते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत त्यानं 5 फोर आणि 8 सिक्स लगावले होते. आता या आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक सिक्स लगावण्यापासून तो फक्त 2 सिक्स दूर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फायनलमध्ये बनेल किंग?
श्रेयस अय्यर आयपीएल फायनलमध्ये सिक्सर किंग बसेल असा त्याच्या फॅन्सना ठाम विश्वास आहे. सध्या या यादीमध्ये फक्त निकोल पूरन (40 सिक्स) श्रेसच्या पुढे आहे. समोर फास्ट स्पिन, डावखुरा किंवा उजवा कोणताही बॉलर असू दे श्रेयस अगदी सहज सिक्स लगावतोय. विशेषत: मुंबई इंडियन्स विरुद्ध तो ज्या पद्धतीनं खेळलाय ते पाहता त्याला सिक्सर किंगपासून रोखण्यासाठी आरसीबीला शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.
( नक्की वाचा : IPL 2025 Final : RCB चं टेन्शन खल्लास, इंग्लंडहून पहाटे परतला विराटचा सहकारी! बायको नाही टीमला प्राधान्य )
विराटसोबतही शर्यत
आयपीएल फायनलमध्ये श्रेयसची स्पर्धा ही आरसीबीचा मुख्य बॅटर विराट कोहलीशी (Virat Kohli) देखील आहे. या सिझनमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅटर्सच्य यादीत साई सुदर्शन (759) पहिल्या क्रमांकावर आहे. तर श्रेयस अय्यर (603) सहाव्या आणि विराट (614) पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे श्रेयस आणि विराटच्या शर्यतीमध्ये कोण जिंकणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर क्वालिफायर 2 सारखी आणखी एक खेळी श्रेयस खेळला तर तो 700 चा टप्पा देखील ओलांडू शकतो.
या आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटनं बॅटिंग करणाऱ्या बॅटर्समध्येही श्रेयस दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये फक्त निकोलस पूरन 196.43 स्ट्राईक रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रेयस 175.80 च्या स्ट्राईक रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world