
आयपीएल 2025 मधील 23 वा सामना आज (बुधवारी) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये गुजरातनं राजस्थानचा 58 रननं पराभव केला. या विजयासह गुजरातनं पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर धडक मारली आहे.
गुजरातनं दिलेल्या 218 रन्सचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल (6) आणि नितिश राणा (1) रन काढून आऊट झाले. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) रियान परागसोबत (Riyan Parag) इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 48 रन्सची पार्टनरशिप केली. कुलवंद खेजरोलीयानं परागला 26 रनवर आऊट करत ही जोडी फोडली. त्यापाठोपाठ राशिद खाननं ध्रुव जुरेलला (5) आऊट करत राजस्थानची अवस्था 4 आऊट 68 केली.
संजू सॅमसन आणि हेटमायर या जोडीनं पाचव्या विकेटसाठी 28 बॉलमध्ये 48 रनची पार्टनरशिप करत निकारानं प्रतिकार केला. पण, प्रसिद्ध कृष्णानं संजूला आऊट करत ही जोडी फोडली. कृष्णानंच हेटमायरला 52 रन्सवर आऊट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुदर्शनची तिसरी हाफ सेंच्युरी
त्यापूर्वी साई सुदर्शनच्या (Sai Sudharsan) 82 रनच्या जोरावर गुजरात टायटन्सनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 217 पर्यंत मजल मारली. साईची या सिझनमधील ही तिसरी हाफ सेंच्युरी आहे. साईनं आत्तापर्यंत या सिझनमधील पाच मॅचमध्ये 54.60 च्या सरासरीनं 273 रन काढले आहेत. सर्वाधिक रन्ससाठी मिळणाऱ्या ऑरेेंज कॅपच्या शर्यतीमध्ये तो सध्या लखनौ सुपर जायंट्सच्या निकोलस पूरननंतर (288 रन्स) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जॉस बटलर आणि शाहरुख खाननं प्रत्येकी 36 रन करत सुदर्शनला चांगली साथ दिली. तर राहुल तेवातियानं 12 बॉलमध्ये नाबाद 24 रन काढले.
( नक्की वाचा : IPL 2025 : ठाकूर तुला मानलं रे... 5 वाईड बॉल ठरले मॅचचा टर्निंग पॉईंट, 'लॉर्ड'चं भन्नाट डोकं समजलं का? )
गुजरात पहिल्या क्रमांकावर
गुजरात टायटन्सचा पाचव्या सामन्यातील हा चौथा विजय आहे. या विजयानंतर गुजरातचे आठ पॉईंट्स झाले असून त्यांनी पॉईंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world