जाहिरात

IPL 2026: राहुल द्रविड-राजस्थान रॉयल्सचं नातं संपुष्टात, मोठी ऑफर नाकारल्याने चर्चांना उधाण

Rahul Dravid Steps Down as Rajasthan Royals Coach : महान क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्सचं नातं संपुष्टात आलं आहे.

IPL 2026: राहुल द्रविड-राजस्थान रॉयल्सचं नातं संपुष्टात, मोठी ऑफर नाकारल्याने चर्चांना उधाण
Rahul Dravid Steps Down as Rajasthan Royals Coach : द्रविड आणि राजस्थान रॉयल्सचं नातं वर्षभरातच संपुष्टात आलं आहे.
मुंबई:

Rahul Dravid Steps Down as Rajasthan Royals Coach : महान क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्सचं नातं संपुष्टात आलं आहे. आयपीएल फ्रँचायझीनं शनिवारी (30 ऑगस्ट) ही घोषणा केली. द्रविडची सप्टेंबर 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2025 मध्ये राजस्थानची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल 2025 मध्ये राजस्थानने 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले आणि ते पॉईंट टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर होते. द्रविडला वेगळ्या पदाची ऑफर दिली होती, पण त्यानं ती नाकारली असं फ्रँचायझीनं स्पष्ट केलं आहे.

काय होतं कारण ?

राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर लिहिले, "राजस्थान रॉयल्स आज जाहीर करते की मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल 2026 पूर्वी फ्रँचायझीसोबतचा आपला कार्यकाळ संपवतील. राहुल अनेक वर्षांपासून रॉयल्सच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाने खेळाडूंच्या एका पिढीला प्रभावित केले आहे, फ्रँचायझीच्या संस्कृतीवर ठसा उमटवला आहे."

राजस्थान फ्रँचायझीने पुढे लिहिले, "फ्रँचायझीच्या स्ट्रक्चरल रिव्ह्यूचा भाग म्हणून राहुलला फ्रँचायझीमध्ये एक मोठे पद देऊ केले होते, पण त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. राजस्थान रॉयल्स, त्यांचे खेळाडू आणि जगभरातील लाखो चाहते फ्रँचायझीसाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राहुलचे मनापासून आभारी आहेत."

2014 आणि 2015 च्या हंगामात संघाचे मेंटर बनण्यापूर्वी, द्रविडने आयपीएल 2012 आणि 2013 मध्ये या टीमची कॅप्टनसी केली होती.  आयपीएल 2025 पूर्वी आरआर सेट-अपमध्ये त्याच्या पुनरागमनामुळे, 2008 मध्ये पहिल्या हंगामात विजेतेपद जिंकल्यानंतर फ्रँचायझीला आपले दुसरे आयपीएल विजेतेपद जिंकण्याची आशा वाढली होती. पण राजस्थानची कामगिरी निराशाजनक राहिली. नियमित कॅप्टन संजू सॅमसन फक्त 9 सामने खेळला. कारण तो दुखापतग्रस्त होता. संजूच्या अनुपस्थितीमध्ये रियान परागनं टीमचं नेतृत्व केलं.

( नक्की वाचा : Rahul Dravid : 'द वॉल' ची प्रांजल कबुली, सचिन तेंडुलकर, गांगुली यांच्याकडून आदर मिळवणं होतं मोठं आव्हान! )
 

द्रविडची दुसरी इनिंग एका वर्षामध्येच संपुष्टात आली. आयपीएल 2025 दरम्यान सेट-अपमधील मतभेद आणि अशांततेमुळे द्रविडने राजस्थानमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आहे.

राजस्थान रॉयल्सला राम-राम केल्यानंतर द्रविड पुढं काय करतो याची सर्वांना उत्सुकता आहे. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन टीम सोडणार असल्याची सध्या चर्चा आहे. त्याने लिलावात रिलीज होण्याचा किंवा ट्रेड डीलमध्ये दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये जाण्याचा हेतू व्यक्त केला होता, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे पुढील सिझनमध्ये राजस्थानची नवी टीम पाहायला मिळू शकते. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com