जाहिरात

IPL 2025, KKR vs SRH : होम गाऊंडवर कोलकाताच किंग, हैदराबादवर मिळवला मोठा विजय

IPL 2025, KKR vs SRH : केकेआरचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. त्यांनी आत्तापर्यंत चार सामन्यात दोन सामने जिंकले असून दोन गमावले आहेत.

IPL 2025, KKR vs SRH : होम गाऊंडवर कोलकाताच किंग, हैदराबादवर मिळवला मोठा विजय
मुंबई:

IPL 2025, KKR vs SRH : आयपीएल 2024 मधील फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) केलेल्या पराभवाचा बदला घेण्यात सनरायझर्स हैदराबादला (SRH) अपयश आलं. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर झालेल्या मॅचमध्ये यजमान टीमनं हैदराबादचा 80 रन्सनं एकतर्फी पराभव केला. केकेआरचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. त्यांनी आत्तापर्यंत चार सामन्यात दोन सामने जिंकले असून दोन गमावले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सनरायझर्सची खराब सुरुवात

आक्रमक बॅटिंगसाठी सनरायझर्सचा या स्पर्धेपूर्वी मोठा बोलबाला झाला होता. केकेआरनं दिलेल्या 201 रन्सचा पाठलाग करताना सनरायझर्सची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा फ्लॉप झाली. ट्रॅव्हिस हेड (Travis Head) 4, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) 2 आणि इशार किशन (Ishan Kishan) 2 रन काढून झटपट आऊट झाले. त्यामुळे सनरायझर्सची अवस्था 3 आऊट 9 अशी झाली होती.

नितीश कुमार रेड्डी (19) आणि कामिंदू मेंडिस (27) यांनी इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण रनरेट वाढवण्याच्या प्रयत्नात ते आऊट झाले. सनरायझर्सच्या अन्य खेळाडूंनाही हा दबाव पेलला नाही. त्यांची संपूर्ण टीम 16.4 ओव्हर्समध्ये 120  रन्सवर ऑल आऊट झाली. कोलकाताकडून वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

( नक्की वाचा : गुजरातच्या विजयानंतर गिलचा विराटवर निशाणा ! 7 शब्दांची पोस्ट Viral )

व्यंकटेश अय्यरची आक्रमक हाफ सेंच्युरी

त्यापूर्वी व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) नं काढलेल्या आक्रमक हाफ सेंच्युरीच्या जोरावर केकेआरनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 200 रन्स केले. अय्यरनं फक्त 25 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी केली. त्यानं 29 बॉलमध्ये 7 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 60 रन केले.

मुंबईकर अंगीकृश रघुवंशीनं 32 बॉलमध्ये 50 रन काढले.  कॅप्टन अजिंक्य रहाणेनं 38 रन काढत त्याला उत्तम साथ दिली. रिंकू सिंहनं 17 बॉलमध्ये नाबाद 32 रन केले.

पॉईंट टेबलमध्ये बदल

गतविजेते केकेआर हा सामना सुरु होण्यापूर्वी शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर होते. या विजयानं त्यांचं प्रमोशन झालं आहे. केकेआरनं आता थेट पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर सनरायझर्स हैदराबादची आठव्या क्रमांकावरुन दहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: