
IPL 2025, LSG vs PBKS : आयपीएल 2025 मध्ये 13 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Punjab Kings vs Lucknow Super Giants) यांच्यात झाला. लखनौमध्ये झालेल्या या मॅचमध्ये पंजाबनं यजमान टीमचा 8 विकेट्सनं पराभव केला. पंजाबचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. त्यांनी यापूर्वी माजी विजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव केला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यजमान लखनौ सुपर जायंट्सनं पहिल्यांदा बॅटिंग करत विजयासाठी 172 रन्सचं आव्हान दिलं होतं. लखनौच्या पिचचा बॉलर्सला मदत करण्याचा इतिहास आहे. त्यामुळे पंजाबसाठी हे टार्गेट आव्हानात्मक असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
पंजाबकडून प्रबसिमरन सिंगनं (Prabhsimran Singh) आक्रमक खेळी करत हे टार्गेट सोपं केलं. त्यानं 34 बॉल्समध्ये 69 रन्स काढले. या खेळीत त्यानं 9 फोर आणि 3 सिक्स लगावले. पंजाबच्या या ओपनरनं 202.94 च्या स्ट्राईक रेटनं रन्स करत टीमच्या विजयाचा पाया रचला.
Singh on song 💪
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2025
Prabhsimran Singh charges #PBKS' chase with a boundary-filled 5⃣0⃣🔝
PBKS are 78/1 after 7 overs.
Updates ▶ https://t.co/j3IRkQFrAa #TATAIPL | #LSGvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/3p4ksjyRKK
प्रबसिमरनं कॅप्टन श्रेयस अय्यरसोबत दुसऱ्या विकेट्ससाठी 44 बॉल्समध्ये 84 रन्सची पार्टरनरशिप केली. कॅप्टन श्रेयसनं पुन्हा एकदा जबाबदारीनं खेळ केला. श्रेयसनं 30 बॉलमध्ये नाबाद 52 रन काढले. पंजाबच्या कॅप्टननं पहिल्या मॅचमध्येही नाबाद 97 रन्सची खेळी केली होती.
त्यापूर्वी टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 171 रन्स केले. लखनौची सुरुवात खराब झाली. ऑल राऊंडर मिचेल मार्श पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर आऊट झाला.
( नक्की वाचा : Rohit Sharma : सचिन तेंडुलकरनं घेतली रोहित शर्माची गळाभेट, फॅन्सनं सांगितला अर्थ )
लखनौचा कॅप्टन ऋषभ पंतनं पुन्हा एकदा निराशा केली. आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू बनलेला पंत फक्त 2 रन्स काढून आऊट झाला. पंतनं या स्पर्धेतील 3 मॅचमध्ये 0, 15 आणि 2 रन्स केले आहेत. कॅप्टनचा खराब फॉर्म ही लखनौसाठी काळजीची गोष्ट आहे.
लखनौकडून निकोलस पूरननं सर्वात जास्त 44 रन्स काढले. आयुष बदानीनं 41 रन काढले. तर अब्दुल समदनं 12 बॉल्समध्ये झटपट 27 रन्सची खेळी केली. पंजाबकडून अनुभवी अर्शदीप सिंगनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या.
पॉईंट्स टेबलमध्ये बदल
पंजाब किंग्जनं मिळवलेल्या या विजयानं आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये बदल झाला आहे. या मॅचपूर्वी पंजाबची टीम पाचव्या क्रमांकावर होती. त्यांनी आता थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) अद्याप नंबर 1 वर कायम आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world