जाहिरात

Rohit Sharma : सचिन तेंडुलकरनं घेतली रोहित शर्माची गळाभेट, फॅन्सनं सांगितला अर्थ

IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या सामन्याच्या नंतर टीमचा मेंटॉर आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं रोहित शर्माची भेट घेतली.

Rohit Sharma : सचिन तेंडुलकरनं घेतली रोहित शर्माची गळाभेट, फॅन्सनं सांगितला अर्थ
मुंबई:

Sachin Tendulkar Meet Rohit Sharma: मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2025 मधील पहिला विजय सोमवारी (31 मार्च) मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईनं कोलकाता नाईट रायडर्सचा (MI vs KKR) 8 विकेट्सनं पराभव केला.  

मुंबई इंडियन्सनं या मॅचमध्ये विजय मिळवला असला तरी रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठी खेळी करण्यात अपयश आलं. तो फक्त 13 रन्स काढून आऊट झाला. आयपीएल 2022 पासून रोहित शर्मा या स्पर्धेत रन्स काढण्यासाठी झगडत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहितनं या कालावधीमध्ये 47 सामन्यात 1038 रन्स केले. त्यामध्ये त्याचा सर्वोच्च स्कोअर 105 आहे. त्यानं या कालावधीत 22.56 च्या सरासरीनं रन्स केले असून त्याचा स्ट्राईक रेट 134.63 आहे. गेल्या 10 इनिंगमध्ये रोहितला फक्त एकदा 20 पेक्षा जास्त रन करता आले आहेत. 

सचिननं घेतली गळाभेट

मुंबई इंडियन्सच्या सामन्याच्या नंतर टीमचा मेंटॉर आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) रोहितची भेट घेतली. मुंबई इंडियन्सच्या दोन माजी कॅप्टनची ड्रेसिंग रुममध्ये भेट झाली. सचिननं रोहितला अलिंगन दिलं. दोन्ही खेळाडूंमध्ये यावेळी चर्चा झाली.

सचिन आणि रोहित यांच्या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्रिकेट फॅन्सनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या असून त्यामधील एक प्रतिक्रिया चांगलंच लक्ष वेधत आहे.

( नक्की वाचा : Hardik Pandya : हार्दिक पांड्या पुन्हा परदेशी महिलेच्या प्रेमात? Viral Video नं झालं शिक्कामोर्तब )

ज्यावेळी सर्वजण रोहितला चिअर्स करत असतील त्यावेळी सचिनला शोधणं अवघड असू शकतं. पण, जेव्हा कुणीही जवळ नसेल त्यावेळी रोहितच्या आसपास सचिनला शोधणे अवघड नाही. काही गोष्टी 2012 पासून बदललेल्या नाहीत.' असं ट्विट या फॅन्सनं केलं आहे.

मुंबई इंडियन्सनं कसा मिळवला विजय?

सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं फक्त 116 रन्स केले. मुंबई इंडियन्सनं हे आव्हान 12.5 ओव्हर्समध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईकडून रियान रिकल्टननं सर्वाधिक रन्स केले. तो 62 रन्स काढून नाबाद राहिला. 

मुंबईकडून अश्विनी कुमारनं सर्वांचं लक्ष वेधलं. त्यानं पदार्पणातील सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर दीपक चहरनं 2 विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, विग्नेश आणि मिचेल स्टँनरनं प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: