जाहिरात

CSK vs PBKS : चहल आणि अय्यरचा तडाखा, पंजाबची दमदार विजयासह पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप

IPL 2025, CSK vs PBKS : अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टसीमध्ये खेळणाऱ्या सीएसकेची यंदा अतिशय निराशाजनक कामगिरी झाली आहे.

CSK vs PBKS : चहल आणि अय्यरचा तडाखा, पंजाबची दमदार विजयासह पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप
मुंबई:

IPL 2025, CSK vs PBKS : युजवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) एकाच ओव्हरमध्ये हॅटट्रिकसह घेतलेल्या चार विकेट्सच्या जोरावर पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्सचा 4 विकेट्सनं पराभव केला. पंजाबकडून प्रबसिमरन सिंह आणि श्रेयस अय्यरनं हाफ सेंच्युरी करत टीमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पंजाबकडून श्रेयस अय्यरनं सर्वात जास्त 72 रन्स केले. 

चेन्नई सुपर किंग्सचा या सिझनमधील  दहा सामन्यातील हा आठवा क्रमांक आहे. अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टसीमध्ये खेळणाऱ्या सीएसकेची यंदा अतिशय निराशाजनक कामगिरी झाली आहे. पॉईंट टेबलमध्ये त्यांचा क्रमांक शेवटचा असून त्यांचं या सिझनमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. 

तर, पंजाब किंग्जचा हा दहा सामन्यातील हा सहावा विजय आहे. या विजयानंतर पंजाबचे 13 पॉईंट्स झाले आहेत. त्यांनी पाचव्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. 

चहलची हॅटट्रिक, करनची दमदार खेळी

युजवेंद्र चहलची हॅटट्रिक आणि सॅम करनची दमदार बॅटींग हे चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य ठरलं. युजवेंद्र चहलनं या आयपीएल सिझनमधील पहिली हॅटट्रिक नोंदवली. त्यानं दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांना सलग आऊट करत ही हॅटट्रिक घेतली. त्यापूर्वी चहलनं त्याच ओव्हरमध्ये महेंद्रसिंह धोनीला देखील आऊट केलं होतं. पंजाबकडून चहलनंच सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीमुळे सीएसकेची इनिंग 190 वर संपुष्टात आली.

Yuzvendra Chahal : W, W, W युजवेंद्र चहलची CSK विरुद्ध सनसनाटी हॅटट्रिक, पाहा Video

( नक्की वाचा :  Yuzvendra Chahal : W, W, W युजवेंद्र चहलची CSK विरुद्ध सनसनाटी हॅटट्रिक, पाहा Video )

सीएसकेकडून ऑल राऊंडर सॅम करननं दमदार बॅटिंग केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या करनची बॅट जुन्या फ्रँचायझीविरुद्ध चांगलीच तळपली. त्यानं 47 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 88 रन काढले. डेवाल्ड ब्रेविसनं 32 रन काढत त्याला चांगली साथ दिली. सॅम करनला मार्को यान्सननं आऊट केलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: