जाहिरात

Yuzvendra Chahal : W, W, W युजवेंद्र चहलची CSK विरुद्ध सनसनाटी हॅटट्रिक, पाहा Video

Yuzvendra Chahal hat-trick : पंजाब किंग्जचा स्पिनर युजवेंद्र चहलनं चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे.

Yuzvendra Chahal : W, W, W युजवेंद्र चहलची CSK विरुद्ध सनसनाटी हॅटट्रिक, पाहा Video
मुंबई:

Yuzvendra Chahal hat-trick : पंजाब किंग्जचा स्पिनर युजवेंद्र चहलनं चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे. चहलनं सीएसकेच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये हा विक्रम केला. त्याच्या या कामगिरीमुळे 200 पार च्या दिशेनं वाटचाल करणारी सीएसकेची टीम 190 रन्सवरच ऑल आऊट झाली.

चहलनं दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांना आऊट करत हॅटट्रिकची नोंद केली. चहलची आयपीएल कारकिर्दीमधील ही दुसरी हॅटट्रिक आहे. त्यानं यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. आयपीएल 2025 मधील ही पहिलीच हॅटट्रिक आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आयपीएलच्या इतिहासात दोन हॅटट्रिक घेणारा चहल हा दुसरा बॉलर ठरलाय. त्यानं युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) रेकॉर्डची बरोबरी केलीय. आयपीएलमध्ये सर्वाधिक 3 वेळा हॅटट्रिक घेण्याचा रेकॉर्ड अमित मिश्राच्या नावावर आहे. 

एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स

पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं 19 वी ओव्हर चहलकडं दिली त्यावेळी सीएसकेची 200 च्या दिशेनं वाटचाल सुरु होती. चहलची या ओव्हरची सुरुवात वाईड बॉलनं झाली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीनं त्याला सिक्स लगावला. पण, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर चहलनं धोनीला आऊट केलं.

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi :वडिलांनी जमीन विकली, बेरोजगार झाले, वैभव सूर्यवंशीला घडवण्यासाठी धडपडणाऱ्या बापाची गोष्ट! )
 

दीपक हुडानं ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर 2 रन काढत खातं उघडलं. पण, त्यानंतर चहलनं हुडाला नेहाल वढेराकडं कॅच द्यायला भाग पाडलं. त्यांतर त्यानं अंशुल कंबोजची पहिल्याच बॉलवर दांडी उडवली. तिसऱ्या बॉलवर नूर अहमदनं उच मारलेला बॉल मार्को यान्सननं पकडत चहलच्या हॅटट्रिकवर शिक्कामोर्तब केले.

सॅम करन चमकला

त्यापूर्वी सीएसकेकडून ऑल राऊंडर सॅम करननं दमदार बॅटिंग केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या करनची बॅट जुन्या फ्रँचायझीविरुद्ध चांगलीच तळपली. त्यानं 47 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 88 रन काढले. डेवाल्ड ब्रेविसनं 32 रन काढत त्याला चांगली साथ दिली. सॅम करनला मार्को यान्सननं आऊट केलं. त्यानंतर चहलनं एकाच ओव्हरमध्ये चार विकेट्स घेत पंजाबला जबरदस्त कमबॅक करुन दिलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: