
IPL 2025, RR vs MI : आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये क्लास खेळाडू म्हणून समोर आलेल्य खेळाडूंमध्ये राजस्थान रॉयल्सच्या वैशव सू्र्यवंशीचा समावेश आहे. वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरोधात धडाकेबाज शतक साजरं केलं. या शतकासह आयपीएलमध्ये तो सर्वात तरुण शतक झळकावणारा खेळाडू तर सर्वात जलद शतक झळकावणार दुसरा खेळाडू ठरला आहे. एका सामन्यात इतिहास घडवणाऱ्या वैभवच्या नावावर आता लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुजरात टायटन्सनंतर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून आणखी एका धमाकेदार खेळीची अपेक्षा होती. मात्र मुंबईविरुद्धच्या सामन्यात तो दुसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. यासोबतच त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. तो आयपीएलमध्ये शून्यावर बाद होणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
शाह मुरीद सर्वात तरुण शून्यावर बाद होणारा खेळाडू
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शुन्यावर बाद होण्याचा विक्रम शाह मुरीदच्या नावावर आहे. 2012 मध्ये लाहोरमध्ये तो 13 वर्षे 284 दिवसांच्या वयात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर हा नावडता विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
जॉर्ज सेसे आणि रेमंड कोकर अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. नायजेरियाविरुद्धच्या सामन्यात 14 वर्षे आणि 313 दिवसांच्या वयात जॉर्ज एकही धावा न करता बाद झाला होता. तर मोजाम्बिविरुद्धच्या सामन्यात 15 वर्षे आणि 81 दिवसांच्या वयात रेमंड शुन्यावर बाद झाला होता.
(ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 : मुंबई इंडियन्सला धक्का, दमदार कामगिरी करणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट)
टी-20 मध्ये शून्यावर आऊट होणारे सर्वात तरुण खेळाडू
- शाह मुरीद - 13 वर्षे आणि 284 दिवस (2012)
- वैभव सूर्यवंशी - 14 वर्षे आणि 35 दिवस (2025)
- जॉर्ज सेसे - 14 वर्षे आणि 313 दिवस (2021)
- रेमंड कोकर - 15 वर्षे आणि 81 दिवस (2022)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world