बिहारमधील केवळ 14 वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. हरारे येथे झालेल्या अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्याने केवळ 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी केली. ज्यामुळे भारताने सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. मात्र, इतकी जबरदस्त कामगिरी करूनही वैभव भारतीय संघात का नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र यापुढेही काही दिवस वैभव भारतीय संघात खेळू शकणार नाही.
भारतीय संघात स्थान न मिळण्याची कारणे
आयसीसीचे किमान वय धोरण
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नोव्हेंबर 2020 मध्ये एक नियम लागू केला, ज्यानुसार कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी किमान 15 वर्षे वय असणे बंधनकारक आहे. वैभवचा जन्म 27 मार्च 2011 रोजीचा आहे. फेब्रुवारी 2026 नुसार त्याचे सध्याचे वय 14 वर्ष आहे. त्यामुळे, तो वरिष्ठ भारतीय संघासाठी 27 मार्च 2026 पूर्वी पात्र ठरू शकत नाही.
(नक्की वाचा- ENGU19 vs INDU19 Final: फायनलमध्ये वैभव सूर्यवंशी चमकला! 'असा'वर्ल्ड रेकॉर्ड केला..सेहवाग, गेलही करू शकले नाही)
बीसीसीआयचा 'एक खेळाडू, एक विश्वचषक' नियम
बीसीसीआयच्या नियमानुसार, एखादा खेळाडू त्याच्या आयुष्यात फक्त एकदाच 19 वर्षांखालील विश्वचषक खेळू शकतो. वैभवने 2026 चा विश्वचषक गाजवला असल्याने, आता तो 2028 किंवा 2030 च्या विश्वचषकात खेळू शकणार नाही, जरी त्याचे वय तेव्हा 19 वर्षांच्या आत असले तरीही.
(नक्की वाचा- Video: आयुष म्हात्रेच्या पालघरच्या घरी तिरंगा फडकला, अनेक ट्रॉफींनी भरलाय घरचा हॉल, 'त्या' एका फोटोने मात्र..)
विक्रमवीर वैभव सूर्यवंशी
- विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या: इंग्लंडविरुद्ध 175 धावा (पूर्वीचा विक्रम उन्मुक्त चंद - 111).
- सर्वात वेगवान 150 (List A): विजय हजारे ट्रॉफीमध्ये केवळ 54 चेंडूत 150 धावा करून त्याने ए.बी. डिव्हिलियर्सचा (64 चेंडू) जागतिक विक्रम मोडला.
- आयपीएलमधील सर्वात तरुण शतकवीर: राजस्थान रॉयल्सकडून खेळताना केवळ 14 वर्षे 32 दिवस वय असताना 35 चेंडूत शतक ठोकले.
- युथ वनडेमधील सर्वाधिक षटकार: एका डावात 15 षटकार आणि करिअरमध्ये 100 षटकार मारणारा तो पहिला युथ खेळाडू ठरला आहे.
- सैयद मुश्ताक अली ट्रॉफी: या स्पर्धेत शतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world