जाहिरात

IPL 2025: आयपीएलमध्ये नवा नियम! संघांचा फायदाच फायदा; काय आहे Replacement Rule?

IPL 2025 Replacement Rule: वैयक्तिक कारणांमुळे हंगामातून बाहेर पडला, तर संघ त्याच्या जागी नवीन खेळाडूची निवड करू शकतो. हा नियम हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि हंगामादरम्यानही लागू राहणार आहे.

IPL 2025: आयपीएलमध्ये नवा नियम! संघांचा फायदाच फायदा; काय आहे Replacement Rule?

इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम सुरू होण्यास 4 दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेतील पहिला सामना २२ मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. आतापर्यंत एकूण 5 खेळाडूंना आयपीएलमधून अधिकृतपणे वगळण्यात आले आहे, त्यापैकी  4 खेळाडूंच्या जागी संघांनी नव्या खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये आलेला रिप्लेसमेंट नियम चर्चेत आला आहे. काय आहे हा नियम अन् कसा होणार फायदा? वाचा....

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयपीएल 2025 मध्ये बीसीसीआयने बदली खेळाडूंच्या निवडीसाठी काही विशिष्ट नियम लागू केले आहेत. या नियमानुसार, जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे हंगामातून बाहेर पडला, तर संघ त्याच्या जागी नवीन खेळाडूची निवड करू शकतो. हा नियम हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि हंगामादरम्यानही लागू राहणार आहे.

बीसीसीआयने संघांना खेळाडू बदलण्यासाठी काही प्रमाणात मोकळीक मिळाली आहे. यापूर्वी स्पर्धेच्या सातव्या सामन्यापर्यंतच खेळाडू बदलता येत आहे आता 12 व्या लीग सामन्यापर्यंत संघ जखमी खेळाडूंना बदलू शकतात. हंगामासाठी नोंदणीकृत उपलब्ध खेळाडूंच्या गटात समाविष्ट असलेला खेळाडूच बदली खेळाडू बनू शकतो.

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis News: दगड-विटांचा मारा, गाड्यांची जाळपोळ, परिसरात तणाव... नागपूर का पेटलं?

 येथे आणखी एक गोष्ट अशी आहे की बदली खेळाडूचा पगार ज्या खेळाडूच्या जागी तो संघात सामील झाला आहे त्याच्या पगारापेक्षा जास्त असू शकत नाही. बदली खेळाडूंसाठी लीग फी चालू हंगामासाठी संघाच्या पगाराच्या मर्यादेत मोजली जात नाही. जर बदललेल्या खेळाडूचा करार पुढील हंगामापर्यंत वाढवला गेला तर त्याची फी पगाराच्या मर्यादेत मोजली जाईल.

बीसीसीआयने नियुक्त केलेल्या डॉक्टरांकडून पुष्टी मिळाल्यानंतरच संघ खेळाडूच्या बदलीची घोषणा करू शकतात. हंगाम संपेपर्यंत खेळाडू दुखापतीतून बरा होऊ शकत नाही याची पुष्टी डॉक्टरांनी करावी. दुखापतीमुळे बाहेर असलेला खेळाडू हंगामात पुढील सामने खेळू शकत नाही.

बीसीसीआयने संघांमध्ये अंशतः बदल करण्यास परवानगी दिली आहे. हे फक्त काही विशिष्ट प्रकरणांमध्ये आणि यष्टीरक्षकासोबतच घडू शकते. तथापि, यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत, जसे की, जेव्हा एखाद्या संघाचे सर्व नोंदणीकृत यष्टीरक्षक सामन्यासाठी अनुपलब्ध असतात, तेव्हा असा संघ बीसीसीआयकडून विशेष सूट मागू शकतो. या परिस्थितीत, बीसीसीआय अल्पकालीन बदली यष्टीरक्षक आणण्याचा विचार करू शकते.

नक्की वाचा - CM Devendra Fadnavis : नागपुरात नेमकं काय घडलं? CM फडणवीसांनी विधानसभेत घटनाक्रम सांगितला

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: