Pappu Yadav reaction on Son Sarthak Ranjan Viral : आयपीएल 2026 साठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावली. पण, त्यांनी खरेदी केलेल्या एका खेळाडूची सध्या सर्व चर्चा आहे. तो खेळाडू म्हणजे लोकसभा खासदार पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन. केकेआरने सार्थकला 30 लाख रुपये या त्याच्या बेस प्राईजवर खरेदी केले आहे.
अबू धाबीमध्ये पार पडलेल्या या लिलावात केकेआरने एकूण 13 खेळाडूंना आपल्या टीममध्ये स्थान दिले असून यामध्ये सार्थकची निवड ही अनेकांसाठी धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरली आहे.
पप्पू यादव यांनी व्यक्त केला आनंद
मुलाची आयपीएलसाठी निवड झाल्यानंतर पप्पू यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सार्थकचे अभिनंदन करताना म्हटले की, अभिनंदन बेटू, आता मनापासून खेळ. तुझ्या कौशल्याच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर आणि तुझे स्वप्न पूर्ण कर. आता आमची ओळख तुझ्या नावाने होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुलाच्या या यशावर पप्पू यादव प्रचंड आनंदी असल्याचे त्यांच्या या पोस्टमधून दिसून येत आहे.
बधाई बेटू
— Pappu Yadav (@pappuyadavjapl) December 16, 2025
जमकर खेलो
अपने प्रतिभा के दम पर
अपनी पहचान बनाओ
अपनी चाहत पूरी करो!
अब सार्थक के नाम से
बनेगी हमारी पहचान! pic.twitter.com/s3gOGe72c2
सार्थक रंजनची क्रिकेटमधील आतापर्यंतची कामगिरी
सार्थक रंजन देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीच्या संघाचे प्रतिनिधित्व करतो.त्यानं आत्तापर्यंत 2 फर्स्ट क्लास सामने खेळले असून त्यात 28 रन बनवले आहेत. त्यामध्ये त्याची सरासरी 9.33 इतकी आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने 4 सामने खेळले असून 26.25 च्या सरासरीने 105 रन केले आहेत. तसेच 5 टी20 सामन्यांमध्ये त्याने 13.20 च्या सरासरीने 66 रन काढले आहेत. आता आयपीएल या जगातील सर्वात टफ T20 लीगमध्ये स्वत:ची प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
(नक्की वाचा : IPL Auction 2026 Update: आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी )
केकेआरची ऐतिहासिक खरेदी
या लिलावात केकेआर 64.30 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम घेऊन उतरली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरून ग्रीनला तब्बल 25.20 कोटी रुपये देऊन विकत घेतले, जी या लिलावातील एक ऐतिहासिक खरेदी ठरली.
केकेआरची पूर्ण टीम
अजिंक्य रहाणे (कॅप्टन), अंगक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, रोव्हमन पॉवेल, सुनील नरीन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कॅमरून ग्रीन, फिन एलन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, मुस्तफिजुर रहमान, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र आणि आकाश दीप
(नक्की वाचा : IPL Auction 2026 : CSK ला नमवून Cameron Green ला घेतलं, पण KKR फसली, जाणून घ्या का कापले जाणार ग्रीनचे पैसे? )
कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रचिन रविंद्र / फिन एलन, टीम सीफर्ट (विकेटकिपर), अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंह, रमनदीप सिंह, सुनील नरेन, हर्षित राणा, मथीशा पथिराना, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world