रशियाच्या नोवोसिबिर्स्क येथे पार पडलेल्या WPPL विश्वचषक स्पर्धेत पॉवरलिफ्टिंगमध्ये 20 वर्षीय कस्तुरी राजमूर्ती हिने सूवर्णपदक पटकावलं आहे. गेल्या रविवारी पार पडलेल्या स्पर्धेत 48 किलो वजनी गटात तिने 75 किलो वजन उचलले. मात्र कस्तुरीचा विश्वचषक स्पर्धेतील सूवर्ण पदाकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
कस्तुरी विजयी झाल्यानंतर बोलताना सांगितलं की, "लहानपणी तामीळनाडूमधील तिरुवन्नमलाई रेल्वे स्टेशनवर आईला पोर्टर म्हणून डोक्यावर जड सामान घेऊन जाताना पाहिले आहे. स्पर्धेत वजन उचलत असताना माझ्या आईने रेल्वे स्टेशनवर सामान उचलल्याचं चित्र डोळ्यासमोर आलं. त्यानंतर अचानक माझे वजन मला हलके वाटू लागले."
(नक्की वाचा- चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानात जाणार का? केंद्र सरकारनं दिलं उत्तर)
कस्तुरीने पुढे सांगितलं की, "माझी आई माझी प्रेरणा आहे. ती माझ्यासाठी सतत मेहनत करत आली आहे. मला आणखी पदके जिंकायची आहेत जेणेकरून तिचे जड सामान घेऊन जाणे थांबवू शकेल. कस्तुरीने म्हटलं की, मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती. जेव्हा मी माझ्या नावाची घोषणा ऐकली तेव्हा मला हलके वाटले."
वर्षभरात चमकदार कामगिरी
कस्तुरीने 2023 मध्ये पॉवरलिफ्टिंगला सुरुवात केली. यानंतर तिने पूर्णपणे पॉवरलिफ्टिंगवर लक्ष केंद्रीय केले. एका वर्षात तिने जिल्हा स्पर्धेत 36 पदकांची कमाई केली. या वर्षाच्या सुरुवातीला तिने युरोपमध्ये स्पर्धेत जाण्याची संधी गमावली. याबाबत बोलताना तिने म्हटलं की, "माझ्याकडे व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी पैसे नव्हते. मी आमच्या आमदारांशी संपर्क साधला, त्यांनी मला 25,000 रुपयांचा मदत केली. मात्र पुढे स्पर्धा रद्द करण्यात आली."
(नक्की वाचा- ऑस्ट्रेलियन PM च्या प्रश्नावर विराट कोहलीचा सिक्सर, Video Viral )
कस्तुरीला नोकरीची गरज
त्यानंतर नोवोसिबिर्स्क स्पर्धेने तिला दुसरी संधी दिली. तिने भारतीय पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या पाठिंब्याने या संधीचे सोने केले. कस्तुरीने म्हटलं की, "मला आधी नोकरी हवी आहे. माझी आई एकमेव कमावणारी आहे. माझे वडील आजारी असतात. माझ्या बहिणी देखील बेरोजगार आहेत. माझे कुटुंब सुरक्षित आणि आनंदी असल्याची खात्री होईपर्यंत मी खेळावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही", असंही कस्तुरीने म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world