Martin Guptill Has Announced Retirement From International Cricket: 2025 मधील पहिल्याच महिन्यात क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी आली आहे. न्यूझीलंडचा अनुभवी बॅटर मार्टीन गप्टीलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गप्टीलनं 2009 साली वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या वन-डे सीरिजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो वन-डे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात जास्त रन करणार तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गप्टीलमुळेच टीम इंडियानं गमावली वर्ल्ड कप विजेतेपदाची संधी
मार्टीन गप्टील म्हंटलं की वन-डे वर्ल्ड कप 2019 ची सेमी फायनल आठवते. इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ती सेमी फायनल झाली होती. पावसामुळे दोन दिवस झालेल्या त्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटिंग करत 8 आऊट 239 रन केले होते.
( नक्की वाचा : Champions Trophy : ... तर पाकिस्तानात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफी! यजमानांवर येणार नामुश्कीची वेळ )
240 रनचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पण, लोअर ऑर्डरमधील महेंद्रसिंह धोनी (50) आणि रविंद्र जडेजा (70) यांनी झुंजार बॅटिंग करत मॅचचं चित्र बदललं होतं. पण, गप्टीलच्या एका अचूक थ्रोमुळे टीम इंडियाच्या हातातून सामना निसटला. गप्टीलनं महेंद्रसिंह धोनी या भारताच्या सर्वात मोठ्या फिनिशरला रन आऊट केलं. त्यानंतर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पराभूत झाली. वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याचं संपूर्ण देशाचं स्वप्न तुटलं.
Happy Retirement Martin Guptill 🇳🇿pic.twitter.com/RzKhFxIvbs
— Richard Kettleborough (@RichKettle07) January 8, 2025
आंतरराष्ट्रीय कारकिर्द
38 वर्षांच्या मार्टिन गप्टीलनं न्यूझीलंडकडून एकूण 367 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 402 इनिंगमध्ये 13643 रन केले. गप्टीलच्या नावावर 1 डबल सेंच्युरी, 23 सेंच्युरी आणि 76 हाफ सेंच्युरींची नोंद आहे.
मार्टीन गप्टीलनं 47 टेस्टमधील 89 इनिंगमध्ये 29.39 च्या सरासरीनं 2586, 195 वन-डे इनिंगमध्ये 41.5 च्या सरासरीनं 7346 तर 118 टी20 इनिंगमध्ये 31.81 च्या सरासरीनं 3531 रन केले. गप्टीलनं टेस्टमध्ये 3 सेंच्युरी आणि 17 हाफ सेंच्युरी, वन-डेमध्ये 1 डबल सेंच्युरी, 18 सेंच्युरी आणि 39 हाफ सेंच्युरी तर टी20 मध्ये दोन सेंच्युरी आणि 20 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world