जाहिरात

IND vs NZ : रोहित-गंभीरचा 'एक्का' ठरला निर्णायक, 1328 दिवसांनंतर खेळणाऱ्या बॉलरनं घेतल्या 7 विकेट्स

India vs New Zealand 2nd Test : अक्षर पटेलच्या जागी त्याचा समावेश केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. तब्बल 1328 दिवसांनंतर टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सुंदरनं या संधीचं सोनं केलं.

IND vs NZ : रोहित-गंभीरचा 'एक्का' ठरला निर्णायक, 1328 दिवसांनंतर खेळणाऱ्या बॉलरनं घेतल्या 7 विकेट्स
Washington Sundar ( Photo - BCCI/Sportzpics)
मुंबई:

Washington Sundar, India vs New Zealand 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पुणे टेस्टच्या पहिल्या दिवस टीम इंडियाच्या 'चेन्नई बॉईज' नं गाजवला. अनुभवी आर. अश्विननं पहिल्या तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुवात करुन दिली. त्यानंतर चेन्नईच्याच वॉशिंग्टन सुंदरनं 7 विकेट्स घेत न्यूझीलंडची पहिली इनिंग 259 रनवर रोखली.  या सीरिजमधील पहिली टेस्ट टीम इंडियानं गमावली आहे. त्यामुळे ही सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीमला पुणे टेस्ट जिंकणे आवश्यक आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुंदरचा चमत्कार

बंगळुरु टेस्टमधील पराभवानंतर टीम इंडियात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला होता. सुंदर टीम इंडियाकडून मार्च 2021 मध्ये शेवटची टेस्ट खेळला होता. पुणे टेस्टमध्ये सुंदरचा कुलदीप यादवच्या जागी समावेश करण्यात आला. अक्षर पटेलच्या जागी त्याचा समावेश केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. तब्बल 1328 दिवसांनंतर टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सुंदरनं या संधीचं सोनं केलं.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीरचा विश्वास त्यानं सार्थ ठरला. सुंदरनं 59 रन देत 7 विकेट्स घेतल्या. सुंदरच्या मॅजिक स्पेलमुळे न्यूझीलंडनं शेवटच्या 7 विकेट्स 62 रनमध्ये गमावल्या. पुणे टेस्टमध्ये पाच विकेट्स घेणारा तो पहिला बॉलर ठरला आहे. त्याचबरोबर सुंदरच्या टेस्ट कारकिर्दीमधील देखील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

'भैय्या, मी सांगतोय ना...' विराट, पंत तयार नव्हते, पण सर्फराजनं केला आग्रह, आणि... Video

( नक्की वाचा :  'भैय्या, मी सांगतोय ना...' विराट, पंत तयार नव्हते, पण सर्फराजनं केला आग्रह, आणि... Video )

न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटिंग करताना सुरुवात सावध केली होती. पाहुण्या टीमकडून डेव्हॉन कॉनवेनं सर्वात जास्त 76 रन केले. तर रचिन रविंद्रनं सीरिजमधील फॉर्म कायम राखत 65 रनची खेळी केली. यापूर्वी बंगळुरुमध्ये झालेल्या टेस्टमध्येही रविंद्रनं निर्णायक क्षणी सेंच्युरी करत न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक वाटा उचलला होता. सुंदरनं एका अप्रतिम बॉलवर रविंद्रची दांडी उडवली.

टीम इंडियाची खराब सुरुवात

टीम इंडियाची पहिल्या इनिंगमध्ये सुरुवात खराब झाली. कॅप्टन रोहित शर्मा शून्यावरच आऊट झाला. त्याला टीम साऊदीनं आऊट केलं. रोहित आऊट झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी सावध खेळ करत अधिक पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियानं 1 आऊट 16 रन केले आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
'भैय्या, मी सांगतोय ना...' विराट, पंत तयार नव्हते, पण सर्फराजनं केला आग्रह, आणि... Video
IND vs NZ : रोहित-गंभीरचा 'एक्का' ठरला निर्णायक, 1328 दिवसांनंतर खेळणाऱ्या बॉलरनं घेतल्या 7 विकेट्स
ind-vs-nz-2nd-test-team-india-in-big-trouble-all-out-for-156-new-zealand-lead-by-103-runs
Next Article
IND vs NZ : पुन्हा पराभवाचं सावट, टीम इंडियावर 12 वर्षांनी येणार नको ती वेळ?