Who Is Syeda Falak : "ऐका फडणवीस, अल्लाहची इच्छा असेल तर एक दिवस हिजाब आणि बुरखा घालणारी महिला भारताची पंतप्रधान बनेल.इंशाल्लाह.."तोच रुबाब, तीच स्टाईल आणि आवाजातही तोच कणखरपणा..फडणवीसांना थेट आव्हान देणाऱ्या या महिलेचं नाव आहे सईदा फलक. ज्यांना 'लेडी औवैसी' म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे या लेडी औवेसीची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत AIMIM चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या सईदा फलकने विरोधी पक्षांवर तोफ डागली आहे. फडणवीसांना मोठं आव्हान देणाऱ्या सईदा फलक आहेत तरी कोण? असा जोरदार ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहे. अशातच जाणून घेऊयात सईदा फलक यांच्याबाबत सविस्तर माहिती..
सईदा फलकच्या विधानामुळे खळबळ
हैदराबादची 31 वर्षीय महिला नेत्या सईदा फलकने सोलापूरसह राज्यातील विविध भागात AIMIM चा प्रचार करताना झळकल्या होत्या. सईदाचा कणखर अंदाज आणि आक्रमक भाषण ऐकण्यासाठी हजारो समर्थकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. असदुद्दीन ओवैसी यांच्यानंतर सईदा त्यांच्या पक्षाची प्रभावी वक्ता म्हणून प्रकाशझोतात आली आहे. सईदाने महाराष्ट्राच्या राजकारणावर सडेतोड प्रतिक्रिया दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "ऐका फडणवीस, अल्लाहची इच्छा असेल तर एक दिवस हिजाब आणि बुरखा घालणारी महिला भारताची पंतप्रधान बनेल.इंशाल्लाह..", असं म्हणत सईदाने फडणवीसांवर खरमरीत टीका केलीय.
नक्की वाचा >> BMC Election Results: मुंबईतले काही धक्कादायक निकाल! ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसले, पाहा संपूर्ण यादी
कराटे चॅम्पियनही आहेत सईदा फलक
राजकारणी म्हणूनच सईदा फलक यांची ओळख नाही, तर त्या एक कराटे चॅम्पियनही आहेत. सईदाने राजकारणाच्या मैदानात विरोधकांना धारेवर धरलं असलं, तरी एक फायटर म्हणून त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजल्या आहेत.त्यांनी 20 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि 22 आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके जिंकून देशाची शान वाढवली आहे.त्या तेलंगणातील पहिल्या महिला खेळाडू आहेत ज्यांनी विश्व आणि आशियाई कराटे चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आणि कॉमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.
नक्की वाचा >> Election Result 2026 : लातूरमध्ये काँग्रेसला बहुमत, संभाजीनगर, नांदेडचे अपडेट काय? मराठवाड्याचे सर्व अपडेट
कराटे चॅम्पियन, वकिली आणि आता राजकारण
सईदा फलक या व्यावसायिकरित्या एक वकिल (अॅडव्होकेट) देखील आहेत.त्या स्वतःची कराटे अकॅडमी चालवतात,ज्यामध्ये त्या तरुणींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देतात. 2020 मध्ये ओवैसी यांच्या AIMIM पक्षात प्रवेश केलेल्या सईदा फलक या महिलांचे अधिकार,संविधानिक मूल्ये आणि अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठवताना दिसतात.मुंबई महापालिका निवडणुकीत AIMIM चा प्रमुख चेहरा म्हणून सईदा फलक चमकल्या. त्यानंतर लोकांनी त्यांना ‘लेडी ओवैसी' असं संबोधण्यास सुरुवात केली. कारण त्यांनी राजकीय सभांमध्ये त्यांच्या आक्रमक भाषणांतून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world