पाकिस्तान-न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एका विचित्र घटना घडली. कॅच घेताना चेंडू चेहऱ्यावर आदळल्याने न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रविंद्र गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरून रक्त येऊ लागले. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले.
रचिन रविंद्र कॅच घेताना, फ्लड लाईट्समुळे तो चेंडू योग्यरित्या पाहू शकला नाही. ज्यामुळे चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि त्याच्या चेहऱ्यावर आदळला. पाकिस्तानच्या डावाच्या 38 व्या षटकात ही घटना घडली.
फलंदाज खुसदिलने शॉट मारला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगकडे गेला. जिथे रचिन रवींद्र उपस्थित होता. रचिन रवींद्रने झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो चेंडू नीट पकडू शकला नाही. जखमी झाल्यानंतर रचिन रवींद्र काही जमिनीवर पडून होता. त्यानंतर फिजिओ मैदानावर आले आणि त्याच्यावर प्रथम मैदानावरच उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेण्यात आले.
(नक्की वाचा- India vs Pakistan Greatest Rivalry : सचिन, सेहवाग नाही तर 'या' फलंदाजाला टरकून होता शोएब अख्तर)
न्यूझीलंड क्रिकेटनुसार, रचिनच्या कपाळाला दुखापत झाली आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्याच्याबद्दल अद्याप कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ट्राय सीरिजच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 78 धावांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 6 गडी गमावून 330 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडसाठी त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. फिलिप्सने 72 चेंडूत शतक ठोकण्याची कामगिरी केली. फिलिप्सच्या 74 चेंडूत 106 धावांच्या नाबाद खेळीमुळे न्यूझीलंडला 330 धावांपर्यंत मजल मारता आली.
(नक्की वाचा : Champions Trophy 2025: एक तासापेक्षा कमी वेळ आणि Ind vs Pak सामन्याची तिकीटं संपली)
तर लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 47.5 षटकांत फक्त 252 धावाच करू शकला. पाकिस्तानकडून फक्त फखर जमानने चांगली फलंदाजी करत 84 धावा केल्या. फिलिप्सला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.