Champions Trophy 2025, India vs Pakistan : 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे चॅम्पिअन्स ट्रॉफी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. सध्या भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळतो आहे. परंतु सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे 23 फेब्रुवारीला दुबईत रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे.
क्रिकेटचा कोणत्याही स्पर्धेतला सामना असो, पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्याची तिकीटं मिळावी यासाठी दोन्ही देशातील कोट्यवधी चाहते हे प्रयत्न करत असतात. रविवारी होणाऱ्या या सामन्यासाची तिकीटंही अवघ्या एका तासाच्या आत संपली असून हा सामना हाऊसफूल होणार असल्याचं युएई क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाखो चाहते तिकीट मिळवण्यासाठी ऑनलाईन वेटिंगवर
भारत विरुद्ध पाकिस्तान या बहुप्रतिक्षीत सामन्याची तिकीटं सोमवारपासून ऑनलाईन विक्रीसाठी खुली करण्यात आली होती. युएई क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुमार 1 लाख 40 हजार चाहते ही तिकीट मिळवण्यासाठी वेटींगवर होते.
काही हजार ते लाख...तिकीटासाठी कितीही रक्कम मोजण्याची चाहत्यांची तयारी
“दुबईत अनेक भारतीय आणि पाकिस्तानी लोकं रहायला आहेत. त्यामुळे हा सामना फक्त एक क्रिकेटचा सामना नाही तर त्यांच्यासाठी एक सेलिब्रेशन आहे. दोन्ही संघांचे चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात येतात आणि तो क्षण साजरा करतात”, अशी माहिती Emirates Cricket Board चे COO सुभान अहमद यांनी Geo News शी बोलताना दिली.
( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का, चॅम्पियन होण्याचं स्वप्न जवळपास समाप्त! )
भारत-पाक सामना तटस्थ ठिकाणी
चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानला मिळालेलं असल्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु ICC ने यावर तोडगा काढत भारताचे सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला. तसेच यापुढे ज्या स्पर्धांचं यजमानपद भारताला मिळेल त्या वेळी पाकिस्तानचे सामनेही तटस्थ ठिकाणी खेळवले जातील असंही ICC ने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world