पाकिस्तानचा संघ टी 20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच फेरीतून बाहेर झाला आहे. अत्यंत निराशाजनक कामगिरीमुळे पाकिस्तानी फॅन्सदेखील नाराज आहेत. त्यामुळे पाकिस्तानी संघावर जोरदार टीका देखील होत आहे. अनेक खेळाडूंवर पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड कारवाई करणार असल्याचं देखील बोललं जात आहे. दरम्यान जलद गोलंदाज हारिस रौफ नव्या वादात अडकला आहे. एका फॅनसोबत वाद घालतानाचा आणि हात उचलतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमका वाद काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत हारिस आपल्या पत्नीसोबत दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, हारिस आपल्या पत्नीसोबत चालताना दिसत आहे. मात्र अचानक तो मागे फिरतो आणि फॅनच्या दिशेने धावतो दिसतो. फॅनसोबत मोठमोठ्याने वाद घालताना दिसत आहे. सिक्युरिटी गार्ड देखील मधे पडतात. हारिसने फॅनवर हात उचलल्याचंही सांगितलं जातंय. मात्र नेमका वाद कशामुळे झाला याची ठोस माहिती समोर आलेली नाही.
(ट्रेंडींग बातमी - बांगलादेशच्या खेळाडूनं Live मॅचमध्ये केली चीटिंग, अंपायर पाहातच राहिले)
व्हिडीओत फॅनचं बोलणं ऐकू येत आहे. त्यात फॅन हारिसला बोलताना दिसत आहे की, "भाई फोटो मागितला आहे. फॅन आहे म्हणून एक फोटो मागितला." त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हारिस त्यानंतर मागे हटतो आणि बोलतो की, हा तुझा भारत नाही. त्यानंतर फॅन बोलतो की, "मी देखील पाकिस्तानी आहे." त्यानंतर हारिस बोलतो की, "ही तुझी सवय आहे."
(नक्की वाचा- T20 WC भारत - पाकिस्तान सामना झाला ते स्टेडियम होणार उद्धवस्त!)
वर्ल्ड कपमधील खराब प्रदर्शनानंतर पाकिस्तानी खेळाडू किती दबावात आहेत, याचं हे एक उदाहरण आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात संघाचा वर्ल्ड कपमध्ये अमेरिका आणि भारतासमोर दारुण पराभव झाला. त्यामुळे संघ पहिल्याच फेरीतून बाहेर झाला. आक्रमक गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या हारिसने वर्ल्ड कपमध्ये 7 विकेट घेतल्या.