Vinesh Phogat: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधील (Paris Olympics 2024) ऐतिहासिक पदकाच्या उंबरठ्यावर आहे. विनेशनं महिलांच्या फ्रीस्टाईल 50 किलो वजनी गटाच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. विनेशसाठी हा ड्रॉ सोपा नव्हता.
विनेशनं प्री क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या युई सुसाकी (Yui Susaki) चा पराभव करत संपूर्ण जगाला थक्क केलं. सुसाकी विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिनं एकही पॉईंट न गमावता गोल्ड मेडल जिंकलं होतं.
युई सुसाई यापूर्वी एकही आंतरराष्ट्रीय सामना हरली नव्हती. तिनं 82 बाऊटमध्ये विजय मिळवला होता. आता युईला पराभूत करणारी विनेश ही पहिली कुस्तीपटू आहे. विशेष म्हणजे विनेश या मॅचमध्ये बराच काळ पिछाडीवर होती. विनेशपासून पराभव काही सेकंद दूर होता. त्यावेळी तिनं बाजी पलटवली.
( नक्की वाचा : Neeraj Chopra : आरंभ है प्रचंड! गोल्डन बॉय नीरज चोप्रा ऑलिम्पिक फायनलमध्ये दाखल, पाहा Video )
कसा मिळवला विजय?
विनेशनं प्री क्वार्टर फायनलमध्ये जपानी कुस्तीपटू युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. फोगाट पहिल्या राऊंडमध्ये 0-1 नं पिछाडीवर होती. त्यानंतर सुसाकीनं दुसऱ्या राऊंडमध्येही एक पॉईंट घेत मोठी आघाडी घेतली.
मॅच संपण्यास फक्त 10 सेकंद बाकी होते. त्यावेळी विनेश 0-2 नं पिछाडीवर होती. त्यावेळी विनेश फोगाटनं सर्वांनाच आश्चर्यचकीत करत जोरदार पुनरागमन केलं. तीनं 2 पॉईंट मिळवत बरोबरी साधली. त्यानंतर लगेच आणखी एक पॉईंट घेत विजय मिळवला.
भारतीय कुस्तीपटू या स्पर्धेत बराच काळ बचावात्मक खेलत होती. पण, शेवटच्या काही सेकंदात तिनं सर्वस्व पणाला लावलं. सुसाकीनं विनेशच्या शेवटच्या डावाला आव्हान दिलं होतं. पण, रेफ्रींनी भारताच्या बाजूनं निर्णय दिला.
WHAT HAVE YOU DONE VINESH!!!
— JioCinema (@JioCinema) August 6, 2024
Vinesh Phogat has defeated the Tokyo Olympics GOLD medalisthttps://t.co/IPYAM2ifqx#OlympicsonJioCinema #OlympicsonSports18 #JioCinemaSports #Wrestling #Olympics pic.twitter.com/RcnydCE3mk
सेमी फायनलमध्ये प्रवेश
विनेशची क्वार्टर फायनलमध्ये युक्रेनच्या ओक्साना लिवाचशी लढत होती. विनेश फोगाटनं ही मॅच 7-5 या फरकानं जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. विनेश फोगाटची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. 2016 साली रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या दरम्यान तिला दुखापतीमुळे निसटत्या अंतरानं ब्रॉन्झ मेडल गमवावं लागलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world